घराणेशाहीचा जन्म पतीपत्नी च्या नात्यातुन होतो व त्यास ऊत्तरदायीत्वाचे बंधन असते – गोपाळ तिवारी
पुणे : देशात ६४ वर्षां नंतर ही “लोकशाही मार्गाने आलेल्या” (भारतिय जनता पक्षाच्या) पंतप्रधानांनी, “देशांत घराणे शाही जपणाऱ्या पक्षांकडून लोकशाही रक्षण होणार नसल्याचे(?)” प्रतिपादन कोणत्या आधारे केले.. (?) असा सवाल राजीव गांधी स्मारक समितीचे अध्यक्ष व काँग्रेस नेते (माजी राज्य-प्रवक्ते) गोपाळ तिवारी यांनी पंतप्रधान मोदी यांना विचारला असून, घराणे शाहीचा जन्म ‘पतीपत्नी च्या नात्यातून’ होतो व त्यास ‘ऊत्तरदायीत्वाचे व जबाबदारीचे बंधन’ असल्याचे सांगितले..!
आजतागायत देशांतील विविध राष्ट्रीय पक्षात असो वा विविध राज्यातील प्रादेशिक पक्षात असो, घराणेशाही ही लोकशाही’ने अर्थात लोकांनीच जपली आहे.. कारण त्यात “लोकशाहीचा” गाभा हाच “जबाबदार ऊतितदाऱ्यीत्व” आहे.. त्यामुळेच देशात संविघानात्मक व धर्मनिरपेक्ष तत्वांची जपणूक होत आली आहे. ‘सामाजिक सलोखा व विविधतेत एकता’ या मुल्यांचे प्रदर्शन भारतीय संस्कृती मघून ऊभ्या देशात होत आले आहे. त्यामुळेच देशाची एकता, अखंडता कायम राखून देश २१ व्या शतकासाठी आवश्यक विकास साघत “आर्थिक महासत्तेच्या” ऊंबरठ्यावर काँग्रेस प्रणीत युपीए ने आणून ठेवला होता.
परंतू लोकशाही प्रक्रियेत पुर्वीच्या सरकारांनी देशांतर्गत खुले ठेवलेले “विचार – भाषण स्वातंत्र्याच्या” आघारे पुर्वीच्या विरोधी पक्षांनी व सध्याच्या सत्तेतील भाजप ने विविधांगी आरोप करून व स्वप्ने दाखवून सत्ता हस्तगत केली. किमान हे तरी पंतप्रधान मोदी व भाजप ने लक्षात ठेवावे. “भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघा”ची पक्षांतर्गत कोणत्या लोकशाही चे पालन आपण करत आहात हे देखील जनतेस सांगावे, असे आवाहन राजीव गांधी स्मारक समिती अध्यक्ष व काँग्रेस नेते गोपाळ तिवारी यांनी जारी केलेल्या ‘प्रसिध्दी पत्राद्वारे’ केले आहे.
