fbpx
Saturday, April 27, 2024
Latest NewsPUNE

संविधानाच्या प्रतींचे वाटप करून संविधान दिन साजरा

पुणे : भारतीय संविधान दिनानिमित्त लोहगाव व परिसरातील पोलिस स्टेशन, रुग्णालय, शाळेत तसेच नागरिकांना संविधानाच्या प्रति भेट देऊन संविधान दिन साजरा करण्याचा अभिनव उपक्रम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे युवा नेते मिलिंद खांदवे यांच्या वतीने करण्यात आला.
ज्या संविधानामुळे देशभरातील वंचित घटकांना न्याय व हक्क मिळाले त्या भारतीय संविधानाचा प्रसार नागरिकांमध्ये व्हायला हवा, आपल्या हक्कांची व कर्तव्याची जाणीव आपल्याला असायला हवी या भूमिकेतून आपण संविधानाच्या प्रती भेट देऊन संविधान दिन साजरा केल्याचे मत मिलिंद खांदवे यांनी या उपक्रमाच्या वेळी व्यक्त केले.

यावेळी श्रीमंत राठोड, राजेंद्र खंदारे, सत्यवान लांडगे, संजय ओव्हाळ, पोलीस निरीक्षक निरगुडकर, डॉ. बोरसे, सचिन मुंजळे, कृष्णा मोहिते, भानुदास खांदवे, गणेश भिसे, कानोरे सर आदींची उपस्थिती होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading