Sunday, September 27, 2026
BusinessLatest News

डाबर च्यवनप्राशच्या वतीने विद्यार्थ्यासोबत जनजागृती मोहीम 

पुणे : हिवाळा हा भारतातील असा ऋतू आहे ज्याची सगळेच आतुरतेने वाट पाहत असतात, परंतु या ऋतूमध्ये सर्दी-खोकला आणि श्‍वसनाच्या समस्या यांसारख्या आजारांची भर पडू शकते; हे आजार याच ऋतूमध्ये सर्वाधिक पहावयास मिळतात आणि सामान्यतः कमी प्रतिकारशक्ती मुळे उद्भवतात. च्यवनप्राश हे सुमारे 3000 वर्ष जुने आणि सुप्रसिद्ध आयुर्वेदिक फॉर्म्युलेशन आहे जे रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वापरले जाते आणि खोकला आणि सर्दी यांसारख्या दैनंदिन संसर्गापासून संरक्षण प्रदान करण्यात मदत करते. डाबर च्यवनप्राश मध्ये अनेक ‘रासायनीक’ औषधी वनस्पती आहेत ज्या त्यांच्या इम्युनोमोड्युलेटरी इफेक्टद्वारे विविध प्रकारच्या संक्रमणांना प्रतिबंध करण्यास मदत करतात.

भावी पिढ्यांच्या आरोग्याचे रक्षण करण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग म्हणून, डाबर च्यवनप्राशने आज देशभरातील वंचित मुलांचे आरोग्य सुरक्षित करण्याच्या उद्देशाने एक मेगा जागरूकता उपक्रम सुरू करण्याची घोषणा केली. या उपक्रमांतर्गत, डाबर च्यवनप्राश डॉ. परमेश्वर अरोरा ( एम.डी. ए.वाय बी.एच.यू. वाराणसी सुवर्णपदक विजेता आणि वरिष्ठ सल्लागार आयुर्वेद) यांच्यासोबत एक जागरुकता सत्र आयोजित करत आहे. बदलत्या ऋतूमुळे, सामान्य बॅक्टेरिया आणि विषाणूंमुळे होणाऱ्या आजारांविरुद्ध लढण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करण्याच्या गरजेबद्दल मुलांना शिक्षित करण्यासाठी हे रोग प्रतिकारशक्ती जागरुकता सत्र आयोजित करण्यात येत आहे.

लाल बहादूर शास्त्री हायस्कूल (खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड) मधील २५० हून अधिक मुलांसाठी आयोजित केलेल्या विशेष सत्रासह आज पुण्यात या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. हिवाळ्यात आजारांशी लढण्यासाठी मुलांमध्ये जागरूकता निर्माण करणे हा या सत्राचा उद्देश होता. मुलांना मूलभूत स्वच्छता आणि पौष्टिक आहाराद्वारे त्यांची प्रतिकारशक्ती वाढवण्याचे मार्ग देखील यावेळी शिकवले गेले.

यावेळी बोलताना, डाबर इंडिया लिमिटेड, मार्केटिंग हेड- हेल्थ सप्लिमेंट्स,प्रशांत अग्रवाल म्हणाले, “कोविड-१९ च्या काळत, मजबूत प्रतिकारशक्ती ही प्रत्येक व्यक्तीची पूर्वीपेक्षा जास्त प्राथमिक गरज बनली आहे. आवळा, अश्वगंधा, गिलोय इत्यादी ४० हून अधिक आयुर्वेदिक औषधी वनस्पतींच्या सामर्थ्याने डाबर च्यवनप्राश नेहमीच आजारांशी लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी ठरले आहे. हे प्रमाणित करण्यासाठी, आम्ही डाबर च्यवनप्राश या विषयावर मोठ्या प्रमाणावर, बहुकेंद्रित, क्लिनिकल अभ्यास पूर्ण केला आहे. या क्लिनिकल अभ्यासात डाबर च्यवनप्राशच्या कोविड-१९ संसर्गावरील रोगप्रतिबंधक उपाय म्हणून फायदेशीर भूमिकेचे मूल्यमापन करण्यात आले.

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading