Friday, June 19, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

पुढचे ८ दिवस महाराष्ट्रासह दक्षिण भारतात जोरदार पावसाची शक्यता

पुणे: नैऋत्य मोसमी वारे भारतातून परत जाऊन आज एक महिना पूर्ण झाला आहे. असं असलं तरी सध्या दक्षिण भारतात ईशान्य मान्सून सक्रिय आहे.त्यामुळे पुढचा एक आठवडा दक्षिण भारतात मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्यानेनुकताच पुढील चार आठवड्यांचा हवामान अंदाज जारी केला आहे. या अंदाजानुसार पुढचे ८ दिवस महाराष्ट्रासह दक्षिण भारतात जोरदार पावसाचीशक्यता आहे. त्यानंतर देशात ईशान्य मान्सूनचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याने २९ आणि ३० नोव्हेंबर रोजी दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, घाट परिसर आणि मराठवाड्यातील काही भागात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. सोमवारी पुण्यासह रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या सात जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मंगळवारी नाशिक, ठाणे, अहमदनगर, पुणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली आणि कोल्हापूर या अकरा जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading