धनुष, सारा आणि अक्षय कुमार स्टारर ‘आतरंगी रे’चा ट्रेलर लॉंच

दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष, बॉलीवूड खिलाडी अभिनेता अक्षय कुमार आणि बबली गर्ल सारा आली खान हे त्रिकुट आपल्याला ‘आतरंगी रे’ या आगामी हिंदी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच यामध्ये तीनही कलाकारांनी आतरंगी भूमिका साकारल्या आहेत. आज या चित्रपटाचा ट्रेलर डिज्नी हॉटस्टारवर प्रदर्शित झाला असून  त्याला प्रेक्षकांची खूप पसंती मिळत आहे. परफेक्ट फिल्म मटेरीयल असलेला हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहायला प्रेक्षकांना खूप आवडले असते; पण हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

‘अतरंगी रे’ सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल रायने केले आहे. तर हिंमाशु शर्माने या सिनेमाचे लेखन केले आहे. या सिनेमाच्या माध्यमातून धनुष्य, सारा आणि अक्षय कुमार हे तिघेही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. दाक्षिणात्य सुपरस्टार धनुषचा हा तिसरा हिंदी चित्रपट असाणार आहे. ‘अतरंगी रे’ येत्या ख्रिसमस ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: