एमएसएलटीए तर्फे मार्च महिन्यापर्यंत 6 आंतरराष्ट्रीय स्पर्धा, 1 राष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन 

पुणे :  देशातील अग्रगण्य क्रीडा संघटनांपैकी एक असलेल्या महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए) यांच्या वतीने व अखिल भारतीय टेनिस संघटना यांच्या संलग्नतेने राज्यभरात एकूण 1लाख 25हजार डॉलर हुन अधिक रकमेच्या 6 आंतरराष्ट्रीय स्पर्धा 21 नोव्हेंबर 2021 ते 22 मार्च 2022 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर यांनी सांगितले की, पुण्यात 2 आयटीएफ कुमार गटाच्या टेनिस स्पर्धा आणि सोलापूर, पुणे, नवी मुंबई व नागपूर ठिकाणी 4 महिला आयटीएफ मानांकन स्पर्धा येत्या महिन्यात आयोजित करण्याचा पुढाकार घेतला आहे. या स्पर्धांमुळे राज्यातील तसेच भारतातील खेळाडूंना महत्वाचे आयटीएफ गुण मिळवण्याची, तसेच जागतिक स्तरावर आपली अधिक प्रगती करण्यास मदत मिळणार आहे. साधारणपणे या सर्व स्पर्धांच्या आयोजनासाठी  एकूण   1लाख 25हजार डॉलर(सुमारे 93लाख) खर्च होणार आहे.
तसेच, या 2 कुमार आयटीएफ स्पर्धांमध्ये गद्रे मरीन आयटीएफ ग्रेड 3 आणि आर्यन पंप्स आशियाई कुमार स्पर्धांचा समावेश असून याचे आयोजन  एमएसएलटीए आणि डेक्कन जिमखाना क्लबच्या वतीने करण्यात येणार आहे.
 
सोलापूर जिल्हा टेनिस संघटनेच्या वतीने 15000डॉलर आयटीएफ महिला टेनिस स्पर्धा, डेक्कन जिमखानाच्या वतीने 25000डॉलर एनइसीसी आयटीएफ महिला टेनिस स्पर्धा, नवी मुंबई स्पोर्ट्स संघटनेच्या वतीने 25000डॉलर आयटीएफ महिला टेनिस स्पर्धा आणि नागपूर जिल्हा टेनिस संघटनेच्या वतीने 25000डॉलर आयटीएफ महिला टेनिस स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय एमएसएलटीए तर्फे डिसेंबरमध्ये औरंगाबाद येथे क्ले  कोर्टवर 14 राष्ट्रीय टेनिस अजिंक्यपद टेनिस स्पर्धेचे आयोजन देखील करण्यात येणार असल्याचे अय्यर यांनी नमूद केले.
अय्यर पुढे म्हणाले की, या स्पर्धांना अखिल भारतीय टेनिस संघटना आणि स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांचा पाठिंबा लाभला आहे. राज्यांतील चार वेगवेगळ्या शहरात एकाच वर्षात अशा आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे आयोजन करणारी एमएसएलटीए ही देशांतील एकमेव संघटना आहे, यात शंका नाही. यावरूनच आपल्या राज्यात टेनिससाठी उपलब्ध असलेल्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधांची कल्पना दिसून येते. या स्पर्धांच्या आयोजनामुळे राज्यातील खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म मिळणार असून राज्यातील 40हुन अधिक खेळाडू आणि देशातील 120 हुन अधिक खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर एकेरी व दुहेरी गटात खेळण्याची आणि आयटीएफ गुण कमावून जागतिक क्रमवारीत सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: