डॉ. शर्वरी इनामदार यांना नॅशनल बेंच प्रेस स्पर्धेत सुवर्ण

पुणे: श्री मनोहर पर्रिकर इंडोअर स्टेडीयम मडगांव- गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत पुण्याच्या डॉ. शर्वरी इनामदार यांनी सुवर्णपदक पटकाविले. 57 किलो खुल्या महिला गटात 70 किलो बेंच प्रेस उचलून त्यांनी सुवर्णपदक पटकाविले.

अन्इक्विप्ड/ क्लासिक बेंच प्रेस प्रकारात  डॉ.इनामदार यांनी चमकदार कामगिरी केली. 16 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत राष्ट्रीय बेंच प्रेस स्पर्धा पार पडल्या.  24 ते 30 डिसेंबर 2021 दरम्यान इस्तांबुल- टर्की येथे होणाऱ्या आशियाई स्पर्धेसाठीही त्यांची निवड झाली आहे.

वैद्यकीय व्यवसायात नावलौकिक मिळवणार्‍या डॉ. शर्वरी इनामदार यांनी पाॅवर लिफ्टींगमध्ये  देखील स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. कुटुंबातील दैनंदिन कामे, रुग्णांची देखभाल अशा रोजच्या धावपळीच्या जीवनातून वेळ काढून त्यांनी सलग चार वेळा ‘स्ट्रॉंग वूमन’ हा किताब जिंकला आहे. अनेक राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्ण पदक मिळविले आहे. शिवाय 2018 मध्ये झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी रजत पदक जिंकले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: