अगस्ती कारखान्यातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याच्या मागणीसाठी साखर आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन

पुणे: शेतकऱ्यांकडे गेले दोन-अडीच वर्षे राज्य सरकार लक्ष देत नाही आहे.शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी विविध संघटना व विविध पक्ष आंदोलन करत आहे.अशातच भाजपचे नेते मधुकर पिचड यांच्या अगस्ती कारखाना मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी यासाठी अकोले बचाव कृती समितीने साखर आयुक्त कार्यालयात वर धरणे आंदोलन केले.
या धरणे आंदोलनाच्या वेळी मधुकर पिचड यानी अगस्ती कारखाना मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराचा निषेध करण्यात आला.
या धरणे आंदोलनाला शेतकरी   नेते दशरथ सावंत, अशोक भांगरे, अमित भांगरे, बीजे देशमुख, शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते व अकोले बचाव  कृती समितीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अगस्ती कारखाना मध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यात यावी,भ्रष्ट संचालकांवर गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी समितीने  केली आहे. 

Leave a Reply

%d bloggers like this: