अमरावती, नांदेड, मालेगाव येथील हिसंचाराप्रकरणी पुणे जिल्हा भाजपच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

पुणे: त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना त्याची क्लिप व्हायरल करून महाराष्ट्रात मालेगाव, अमरावती व नांदेड येथे नुकत्याच दंगली झाल्या. पंधरा हजार ते चाळीस हजार लोकांचे जमाव रस्त्यावर उतरून दुकाने, कार्यालये, गाड्या यांचा विध्वंस केला गेला. अशा समाज विघातक कृत्याचा भारतीय जनता पार्टी निषेध करते.

जमावाने केलेल्या हिंसाचाराची उत्स्फूर्त प्रतिक्रिया म्हणून अमरावतीमध्ये लोक रस्त्यावर उतरले. ते कोण्या एका पक्षाचे नव्हते व कोणी त्यांचे नेतृत्व करत नव्हते. स्वसंरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरही हल्ले केले गेले. मात्र या सगळ्यानंतर पोलीस यंत्रणेकडून पक्षपाती पद्धतीने कारवाई केली जात आहे. अफवा पसरवून दंगल करणाऱ्यांना पाठीशी घालून स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या सामान्य लोकांना पोलिसांकडून लक्ष्य केले जात आहे.

या संदर्भात मागण्या खालीलप्रमाणे मा. जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन द्वारे देण्यात आले –

१. त्रिपुरा येथे न घडलेल्या घटनेच्या आधारे मालेगाव, अमरावती व नांदेड येथे अफवा पसरवून व धार्मिक भावना भडकवून दंगल घडविण्याच्या प्रकाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत झाली पाहिजे.

२. ही दंगल घडविणाऱ्या सूत्रधारांना व त्यांच्या समर्थकांना अटक केली पाहिजे.

३. दंगलीत हात असलेल्या रझा अकादमीवर बंदी घातली पाहिजे.

४. स्वसंरक्षणासाठी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांवरील कारवाई बंद करावी.

५. भारतीय जनता पार्टीच्या नेते – कार्यकर्त्यांवरील पूर्वग्रहदूषित कारवाई थांबवावी आणि त्यांच्याविरोधात दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत.

माजी मंत्री बाळा भेगडे आणि जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच मा. जिल्हा परिषद अध्यक्ष व पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदरभाऊ कामठे यांच्या उपस्थितीत यावेळी सरचिटणीस धर्मेद्र खांडरे, जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव, हवेली तालुका माजी. अध्यक्ष रोहीदास शेट उंद्रे, पुणे जिल्हाध्यक्ष कायदा आघाडी ॲड. संजय सावंत पाटील यांच्यासह सर्व पुणे जिल्हा भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: