डॉ. संभाजी मलघे यांच्या ग्रंथास मानाचा पुरस्कार

पिंपरी : इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी नुकत्याच लिहिलेल्या प्रिय दिगेश या ग्रंथास महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने पुरस्कार जाहीर झाला आहे. माधुरी वैद्य यांच्या नावे दिला जाणारा प्रतिष्ठेचा व नामांकित श्रीवत्स प्रकाशनाच्या माध्यमातून साकारणारा प्रतिष्ठेचा ‘विपुलश्री ‘पुरस्कार मलघे यांच्या ग्रंथास समारंभपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. रोख रक्कम आणि मसापचे सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

डॉ. संभाजी मलघे हे सातत्याने कथा, कविता ,कादंबरी ललित समीक्षा या क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण व आगळेवेगळे लेखन करणारे लेखक म्हणून मान्यता पावत आहेत. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता एस .एम .जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात संपन्न होणाऱ्या समारंभाच्या निमित्ताने सदर पुस्तकाचा गौरव होणार आहे.

महाराष्ट्र साहित्य परिषद ही महाराष्ट्रातील आद्य साहित्य संस्था आहे. गेली 116 वर्षे ही संस्था ही संस्था मराठी भाषा साहित्य आणि समीक्षा व संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. गेली अनेक वर्ष मराठीतील नामांकित साहित्यकृतींना हा सन्मान देण्यात येत आहे. यंदाचा प्रतिष्ठेचा समजला जाणारा सन्मान डॉ. संभाजी मलघे यांच्या ग्रंथास जाहीर झाला आहे. डॉ. संभाजी मलघे यांचा यानिमित्ताने गौरव महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते होणार आहे .डॉ. मलघे यांनी आजपर्यंत कथा, कविता, कादंबरी, ललित, समीक्षा तसेच चरित्रलेखन, संपादने या क्षेत्रात वीस पुस्तकांचे योगदान दिले आहे. 

यापूर्वी देखील त्यांच्या डॉ. नागनाथ कोत्तापल्ले सार्थक साहित्य प्रवास, आचार्यदर्शन, वेदनांचे चेहरे, आंबेडकरी राजकारण दशा आणि दिशा, समतेचा ध्वज या ग्रंथांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांच्या या कार्याचे यानिमित्ताने सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: