शासनाने रझा अकादमी वर बंदी घालावी -कर्नल सुरेश पाटील
पुणे: जस्टीस फॉर जवान संघटनेने महाराष्ट्र शासनातर्फे लोकार्पण केलेल्या स्मारकाची रझा अकादमी ने तोडफोड केली.त्यावेळी महाराष्ट्र दंगे होऊ नयेत, म्हणून सैनिकांनी संयम बाळगला. त्यामुळे शासनाने रझा अकादमी संघटनेवर बंदी घालावी, अशी मागणी निवृत्त कर्नल सुरेश पाटील यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली.
या पत्रकार परिषदेत रझा अकॅडमीने 2012 काली राज्याचे मुंबईचे स्मारकाची तोडफोड केल्याचा जस्टीस फॉर जवान संघटनेतर्फे निषेध नोंदवण्यात आला. या पत्रकार परिषदेला कॅप्टन परशुराम शिंदे, कॅप्टन कटके, कॅप्टन बाबू जाधव, भामे पडवळ, अंकुश महाजन, अंधारे सुभेदार, धुमाळ व इतर माजी सैनिक उपस्थित होते.
