Saturday, May 2, 2026
Latest NewsPUNE

पाषाण आणि भांबुर्डा येथे पाण्याच्या टाक्यांसाठी भूसंपादनास निधी

पुणे: समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत पाषाण आणि भांबुर्डा येथे टाक्या उभारण्यासाठी वन विभागाकडून भूसंपादन करण्यास आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, ‘समान पाणीपुरवठा योजनेअंतर्गत शहरात ८२ टाक्या उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यापैकी दोन टाक्या पाषाण आणि भांबुर्डा, शिवाजीनगर येथे आहेत. या जागा वन विभागाच्या अखत्यारीत आहेत. पाषाण येथे ०.५७१ हेक्टर आणि भांबुर्डा येथे ०.७०३१ हेक्टर जागा संपादन करण्यात येणार आहे. त्यासाठी अनुक्रमे ११ लाख ७४ हजार आणि १३ लाख ९२ हजार रुपये असे एकूण २५ लाख ६८ हजार रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत.’

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading