fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

पुणे महापालिका म्हणतेय, बाजीराव पेशवे यांच्या नावाची पाटी लावयाला निधी नाही


पुणे : शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या बाजीराव रस्त्यावर पहिले बाजीराव पेशवे यांच्या नावाची पाटी गेल्या अडीच वर्षांपासून गायब झाली आहे. ती पाटी पुन्हा लावण्यात यावी, अशी मागणी पेशवे यांच्या वंशजांणी केली आहे. मात्र पुणे महापालिकेने या मागणीला निधी उपलब्ध नसल्याचे अजब उत्तर दिले आहे. तसेच प्रायोजक आणल्यास पाटी लावू, असे उद्धट पणाचे उत्तर दिले आहे.

बाजीराव रस्त्यावर सणस प्लाझा इमारती समोरच्या बाजूच्या पदपथावर श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या नावाची पाटील महापालिकेने पूर्वी लावली होती. सुमारे अडीच वर्षांपूर्वी ही पाटी काढून टाकण्यात आली. ती पुन्हा लावावी, यासाठी पेशव्यांच्या वंशज आदिती अत्रे गेल्या तीन महिन्यांपासून महापालिकेच्या विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयात पाठपुरावा करीत आहेत. मात्र, विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाने ‘आमच्याकडे पैसे नाहीत. प्रायोजक आणा. लगेच लावतो’ असे संतापजनक उत्तर दिल्याचे अत्रे यांनी सांगितले.पेशव्यांच्या बाबतीत अशी उत्तरे मिळावीत हे महापालिकेला लांच्छनास्पद आहे, असे अत्रे म्हणाल्या

अत्रे म्हणाल्या, ”महत्त्वाच्या रस्त्यावर पाटी पुन्हा बसवावी, यासाठी पाठपुरावा करावा लागतो आणि तो केल्यावर असे उत्तर मिळते, याचे वाईट वाटते. मला कोणताही वाद निर्माण करायचा किंवा कोणाला दोष द्यायची नाही. परंतु, बाजीराव रस्ता, अशी पाटी पुन्हा बसविण्यात यावी, एवढीच विनंती आहे.” या बाबत विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते उपलब्ध झाले नाहीत. या बाबत नगरसेवक राजेश येनपुरे म्हणाले, ”बाजीराव रस्त्यावर थोरले बाजीराव पेशवे यांच्या नावाची पाटी तातडीने बसविण्यात येईल. तसेच निधी नसल्याचे उत्तर कोणत्या अधिकाऱ्याने दिले या बाबत माहिती घेऊन त्यांच्याकडे विचारणा करू.”

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading