नवीन रिक्षा दर लागू होण्यासाठी ऐप, भाडेदर तक्ता वापरण्यास परवानगी मिळावी

रिक्षा पंचायतीची मागणी

पुणे : येत्या 22 नोव्हेंबर पासून पुणे शहरात नवीन रिक्षा भाडे दर लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर रिक्षा चालकांना ऐप, भाडेदर तक्ता वापरण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी रिक्षा पंचायतीने केली आहे.   

रिक्षा पंचायतीचे सरचिटणीस नितीन पवार म्हणाले, सोमवार 22 नोव्हेंबर पासून जे रिक्षा चालक आपल्या मीटरचे प्रमाणिकरण करून घेतील, त्याच रिक्शा नवे भाडेदर घेण्यास पात्र असतील,असे आदेशही प्राधिकरणाने दिलेत. उलट पक्षी प्रमाणिकरणाचा दर इ. विषयी परिवहन अधिकाऱ्यांनी अजून अंतिम निर्णय घेतला नाही.तो घेण्यासाठी मीटर व्यवसायिकांची बैठक आज 22 नोव्हेंबरला सायंकाळी परिवहन कार्यालयात होणार होती. हे सर्व वेळ खाऊ तर आहेच. त्यासोबतच रिक्षा चालकांना विनाकारण अधिक खर्चात टाकणारे आहे.

ज्यातून एकूण कोट्यवधी रुपये रिक्षा चालकाला मोजावे लागणार आहेत. आताच्या तंत्रज्ञानाच्या मध्ये ज्यासाठी अगदी काही सेकंद ,काही मिनिटामध्ये जो कार्यक्रम/ प्रोग्रॅम बदलता येऊ शकतो. त्याचा अधिकार मीटर कंपन्याकडे दिल्यामुळे ते त्यासाठी वेळ तर लावतातच. त्याशिवाय अव्वाचे सव्वा पैसे हे मीटरचे भाडे दर बदलण्यासाठी घेतले जाणार आहेत. या विषयी आधीही रिक्षा पंचायतीने प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला लेखी मागणी केली आहे. आणि रिक्षाची संख्या लक्षात घेता मीटर उत्पादकांची संख्या जी आमच्या माहितीनुसार 5 व मीटर सेवा केंद्रांची २७ अशी आहे ती लक्षात घेता ते रोज किती रिक्षा करतील? याची संख्या आणि उपलब्ध दिवस(70) आहेत तो पर्यंत मीटर मधील भाडे दर मीटर मधील बदलून होणं अशक्य आहे. हे निदर्शनाला आणले आहे. यासाठी अलीकडेच झालेल्या मुंबई मधील भाडे रिक्षा टॅक्सी भाडेदर बदलले ,त्यावेळेचा अनुभव लक्षात घ्यावा. हे भाडे दर बदलून घेण्याची प्रकीया दीर्घ काळ चालली. हे लक्षात घेता एकतर रिक्षा चालकाला मीटरचा प्रोग्रॅम बदलून होईपर्यंत (सध्याच्या कालावधीत अजून २ महिने वाढ करून) नवीन भाडेदराचा तक्ता जवळ बाळगण्यास परवानगी द्यावी. (जी मुंबईत दिली होती )याची मागणी आधीच पंचायतीने केली आहे. तसेच फेअर फेअर नावाचे एक App एका मराठी ज्येष्ठ यशस्वी उद्योजकाने तयार केले आहे. सध्याची भाडे दर लागू असतानाच्या काळात पंचायत प्रतिनिधींनी रिक्षातून फिरून प्रत्यक्ष चाचणी घेतली आहे.आणि ते रिक्षाचे सर्व वेंटिग आणि बाकी सर्व गोष्टी किलोमीटर नुसार होणारी भाडे दर इ. सह बिनचूक चाललं असा अनुभव आहे. फेअर फेअर नावाचे App प्रवाशी आणि रिक्षाचालकास दोघांसही डाऊनलोड करून घेण्यास परवानगी द्यावी.हे App गुगल स्टोर मध्ये सर्वांना विनामूल्य उपलब्ध आहे. ज्यांनी डाऊन लोड केले आहे त्यांना सोमवार पासून जी भाडे दर लागू होणार आहे. ते रिक्षा भाडे दर घेण्यास/देण्यास परवानगी द्यावी. ज्याच्यामुळे पहिल्या दिवसापासून भाडे दरवाढीची अंमलबजावणी होऊ शकेल अन्यथा आधी उल्लेख केल्या प्रमाणे यास कालावधी दिर्घ लागेल. हा App आपल्या मोबाईल मध्ये डाऊनलोड करून परिवहन अधिकाऱ्यांनी स्व:ता त्याची उलट तपासणी करावी आणि वर उल्लेख केला त्याप्रमाणे त्याच्या वापरास परवानगी द्यावी अशी पंचायतीने निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

 

Leave a Reply

%d bloggers like this: