पसायदानावरील प्रवचनमालेचे आयोजन

पुणे  : संत ज्ञानेश्वर माउलींच्या ७२५ व्या संजीवन समाधी सोहळ्याचे औचित्य साधत श्रीगजानन महाराज (शेगाव) सेवा प्रतिष्ठान, सहकारनगर यांच्या वतीने वैश्विक प्रार्थना असलेल्या पसायदानावर श्री संत सेवा संघाचे संस्थापक पू. संजय गोडबोले गुरुजी यांच्या प्रवचनमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या गुरुवार, दि. २५ नोव्हेंबर ते गुरुवार दि. २ डिसेंबर २०२१ दरम्यान सहकारनगर येथील श्रीगजानन महाराज मंदिर या ठिकाणी सायंकाळी ७ ते ८.३० दरम्यान सदर प्रवचनमाला होणार असून ती सर्वांसाठी विनामूल्य खुली आहे.

आपण सर्वच जण लहानपणापासून पसायदान म्हणत आणि ऐकत आलो आहोत. मात्र वैश्विक प्रार्थना म्हणून ओळखल्या जाणा-या या पसायदानाचा अर्थ काय, तो अर्थ आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात कसा उपयुक्त ठरतो या संदर्भात या प्रवचनमालेच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात येणार आहे. संत ज्ञानेश्वर माउलींच्या संत वाङ्मयातील सकल मानवतेच्या कल्याणाचा विचार सर्वदूर पोहोचविण्याचा श्री संत सेवा संघाचा हा एक प्रयत्न असल्याची माहिती संघाच्या वतीने देण्यात आली.

Leave a Reply

%d bloggers like this: