शेतकऱ्यांचा दमनकारी सरकारच्या विरोधातील मोठा विजय आहे – मुकुंद किर्दत

पुणे : आज या शेतकऱ्यांच्या विजया बद्दल आणि दमनकारी-जनहित विरोधी मोदी सरकारच्या पराभवाबद्दल आप पुणे तर्फे झाशी राणी पुतळ्याजवळ मिठाई वाटून आनंद साजरा केला गेला. आज झाशी राणी व गुरू नानक जयंती असल्याने त्यांना अभिवादन केले गेले.

मानवाच्या उद्धारासाठी आत्मक्लेशातून, शांततामय मार्गाने उद्दिष्ट साध्य करता येते हे सिद्ध झाले आहे. निवडणुकीतील संभाव्य पराभवाला घाबरून मोदी सरकारने हा निर्णय घेतला असावा परंतु हा निर्णय आधी घेतला असता तर सातशे पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा जीव वाचला असता. असे मुकुंद किर्दत, आप पुणे जिल्हा अध्यक्ष यांनी मत व्यक्त केले. 
कृषी बिले रद्द झाल्यावर खात्रीचा कायदेशीर हमीभाव ही महत्वाची मागणी असून त्याला आप चा पाठिंबाच आहे. या आनंदाच्या क्षणी आम आदमी पार्टी सह जनता दल, राष्ट्रसेवादल, सिपीआय चे कार्यकर्ते उपस्थित होते. 

Leave a Reply

%d bloggers like this: