विक्रम गोखले यांच्या घरा समोर 27 नोव्हेंबर पासून सत्याग्रह करणार -उपराकार लक्ष्मण माने

पुणे: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने  हिने एका मुलाखती दरम्यान कंगनाने थेट भारत देशाच्या स्वातंत्र्यावर वक्तव्य केले आहे. कंगना रनौत म्हणाली की, ‘रक्त वाहणारचं होतं, पण भारतीयांचं रक्त वाहायला नको होतं. त्यांना माहित होतं आणि त्यांनी त्याची किंमत मोजली. 1947 मध्ये जी मिळाली ती भीक होती, देशाला स्वातंत्र्य तर 2014ला मिळालं आहे.असे वक्तव्य कंगना रनौतने केले होते.त्यावर अभिनेते विक्रम गोखले यांनी तिची पाठराखण केली होती.त्यामुळे काही वाढ निर्माण झाला आहे  .त्यावर मी अभिनेते विक्रम गोखले जीपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत यांच्या घरा समोर 27 तारखेपासून सत्याग्रह करणार आहे.अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत उपराकार, पद्मश्री लक्ष्मण माने यांनी दिली.

या पत्रकार परिषदेला विशाल जाधव उपस्थित होते. अभिनेत्री कंगना रनोत आणि विक्रम गोखले यांनी उधळलेल्या मुक्ताफळांची झाडाझडती आज उपराकार पद्मश्री लक्ष्मण माने घेतली.
लक्ष्मण माने म्हणाले,अभिनेत्री कंगना रनौत हिचे शिक्षण फक्त बारावी पास आहे. तिला भारताच स्वातंत्र्य कधी मिळाले ते पण माहित नाही. अभिनेते विक्रम गोखले व कंगना रनौतच्या विरोधात आज आम्ही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करणार आहोत. विक्रम गोखले हे जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत मी त्यांच्या घरासमोर सत्याग्रह करत राहणार.असे लक्ष्मण माने म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: