संभाजी ब्रिगेडच्या वतीने पुण्यात साखर वाटून शेतकरी आंदोलनाचा जल्लोष…

पुणे : शेतकऱ्यांनी दीड वर्ष आंदोलन करून ७०० शेतकऱ्यांनी स्वतःचे प्राण देऊन आंदोलन यशस्वी केल. केंद्र सरकार अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांच्या आंदोलनाला घाबरून आज शेतकरीविरोधी ३ काळे कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल केंद्र सरकारचे व तमाम शेतकऱ्यांचे अभिनंदन अशा शब्दांत संभाजी ब्रिगेड चे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी कृषी कायदे मागे घेण्याच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 

केंद्र सरकारच्या आडमुठे धोरणामुळे ७०० शेतकरी शहीद झाले. उत्तर प्रदेश आणि पंजाब च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने शेतकरी विरोधी कायदे पाठीमागे घेतलेले आहेत. परंतु केंद्र सरकारने अधिवेशनामध्ये अधिकृत हे कायदे रद्द करावेत, फसवू नये. जे शेतकरी आंदोलनात शहीद झाले त्यांच्या कुटुंबाला केंद्र सरकारने मोबदला देऊन कुटुंबातील सदस्याला शासकीय नोकरीमध्ये समाविष्ट करुन घ्यावे… अशी केंद्र सरकारला संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनंती वजा मागणी आहे. दिड वर्षानंतर मोदी सरकारला उशिरा सुचलेलं शहाणपण आहे. परंतु त्यामध्ये शेतकऱ्यांचे हित असल्यामुळे सरकारच्या या निर्णयाचं अभिनंदन…

यावेळी साखर वाटप करताना संभाजी ब्रिगेडचे महाराष्ट्र प्रदेश संघटक संतोष शिंदे, पुणे शहराध्यक्ष अविनाश मोहिते, उपाध्यक्ष महादेव मातेरे, मराठा सेवा संघाचे दौंड तालुकाध्यक्ष समीर मोहिते, किर्तीकुमार घोरपडे, दिलीप सावंत, रणजित खंडागळे, नंदकिशोर मोहिते, डाॕ. खंडू जगताप, तापकीर व नितीन वाघेरे आदी शेतकरी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: