आंतरराष्ट्रीय पुरूष दिन – श्रद्धा कपूरने शेयर केली भावूक पोस्ट

अर्चना पूरन सिंह, डब्बू रत्नानी यांनीही व्यक्त केल्या सुंदर भावना

बॉलीवुड अभिनेत्री श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) बॉलीवुडच्या सर्वात सुरेख अभिनेत्रींपैकी एक आहे. तिचे सोशल मीडियावर कोट्यवधी चाहते आहेत. सध्या तिची एक पोस्ट सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होते आहे. आज इंटरनेशनल मेन्स डे (International Men’s Day) आहे.

यानिमित्त श्रद्धाने दोन फोटोज सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. हे फोटोज ती ज्यांच्यावर खास प्रेम करते अशा व्यक्तींसोबतचे आहेत.

या दोन व्यक्ती आहेत वडिल शक्ती कपूर आणि भाऊ सिद्धांत कपूर. या फोटोजमध्ये श्रद्धा खूप सुरेख दिसते आहे.

फोटोतून कळते आहे, की श्रद्धा खासगी आयुष्यात या दोघांच्या अतिशय जवळ आहे. एवढेच नाही, तर ती दोघांना स्पेशलही मानते.

या फोटोजसोबत श्रद्धाने एक भावुक पोस्टही आपले वडिल आणि भावासाठी लिहिली. त्यात ती म्हणाली, ‘वास्तव आयुष्यात आदर्श व्यक्ती तीच आहे, जी सगळ्या प्रकारच्या अडचणींचा सामना करते, तरीही लोकांना क्षमा करणं तिला जमतं. ही व्यक्ती सगळ्यांसोबत अडचणीत उभी राहते. आणि मला अभिमान आहे, की माझ्या आयुष्यात ही दोन माणसं आहेत, ज्यांना मी खूप चांगलं ओळखते. Happy Men’s Day!! 💫💜#MensDay #KooOfTheDay #KooKiyaKya #Koo

Leave a Reply

%d bloggers like this: