कृषी कायदे मागे घेतल्याने पुणे शहर महिला काॅंग्रेस कमिटीच्या वतीने साखर वाटून जल्लोष

पुणे: आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन कृषी कायदे परत घेण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाने शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झाला आहे. या निर्णयाचे स्वागत करण्यासाठी .विविध पक्षा कडून  आज सकाळपासूनच आनंदोत्सव साजरा केला जात आहे. पुण्यात अलका चौकात पुणे शहर महिला काॅंग्रेस कमिटीच्या वतीने साखर नागरिकांना वाटून जल्लोष करण्यात आला.

हा जल्लोष पुणे शहर महिला काॅंग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सोनाली मारणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आला.
ह्या जल्लोषाचा वेळी माजी  महापौर कमल व्यवहारे, माजी आमदार दीप्ती चौधरी, सीमा महाडिक, राजश्री अडसूळ, गीता तारू, शवेरी गोठारणे, ज्योती परदेशी, द.स पोहेकर, शारदा वीर, सुंदर ओव्हाळ,शिवाणी माने,पुणे शहर महिला काँग्रेसच्या ब्लॉक कमिटीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सोनाली मारणे म्हणाल्या,केंद्र सरकारने तीन जुलमी,काळे कृषी कायदे मागे घेतले नाही .म्हणून शेतकरी आख्या देशात आंदोलन करत होते. त्यांच्या आंदोलनाला यश मिळाले आहे. म्हणून आज आम्ही साखर वाटून आनंद व्यक्त करत आहोत. असे सोनाली मारणे म्हणाल्या.
दीप्ती चौधरी म्हणाल्या, भाजपला आता समजले की तीन जुलमी,काळे कृषी कायदे मागे घेतले नाही म्हणून आपल्याला निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. आता खरी सुरुवात झाली आहे. येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत भाजप पूर्णपणे पराभव होईल.असे दीप्ती चवधरी म्हणाल्या.

Leave a Reply

%d bloggers like this: