मॅरेथॉन धावपटू कासोदेकर गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी सज्ज

पुणे : मॅरेथॉन शर्यतीत आपला वेगळा ठसा उमटविणारे, प्रदिर्घ काळ सायकलिंग करणारे बास्केटबॉलपटू, प्रवासी उद्योजक एक बहुआयामी उत्कट क्रीडापटू ज्याने वेडा विचार करा, कच्चे रहा हे आपल्या जीवनाचे ब्रीदवाक्य केले असा अस्सल पुणेकर आशिष कासोदेकर अल्ट्रा डायनामो या सर्वाधिक दिवस मॅरेथॉन धावण्याचा जागतिक विक्रम करण्यासाठी सज्ज झाला आहे. या विक्रमाची दखल गिनीज बुक्स ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड घेणार असून, त्यासाठी तो ६० दिवसांत ६० पूर्ण मॅरेथॉन धावणार आहे. येत्या २८ नोव्हेंबरपासून तो या उपक्रमाला सुरवात करेल. त्यानंतर २६ जानेवारी २०२२ रोजी तो अखेरची मॅरेथॉन धावेल.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डसाठी कासोदेकर प्रयत्न करणार असल्याची घोषणा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठीचे कुलगुरू  प्रा. डॉ. नितीन करमळकर यांनी केली. ट्रॅव्हल टाईमचे व्यवस्थापकीय संचालक आणि सह संस्थापक विवेक काळकर, अल्ट्रा डायनामोचे संस्थापक आणि स्पर्धा संचालक अरविंद बिजवे, धावपटू आशिष कासोदेकर, कोहिनुर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल, मृणाल काळकर या वेळी उपस्थित होते.

स्पर्धा संचालक अरविंद बिजवे म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून आम्ही मेकिंग इंडिया रन मोहिम करत आहोत. पण, कोविडच्या कालावधाती १८ महिन्यात मॅरेथॉन आणि मोठे सोहळे असे झालेच नाहीत. त्यामुळे आमच्या डोक्यात ६० दिवस सलग ६० मॅरेथॉन करण्याची कल्पना आली. या शर्यतीत सहभागी होण्यासाठी धावपटूंनी कोणाताही एक दिवस निवडायचा आहे. मॅरेथॉन शर्यत धावपटूंना स्वतःची तंदुरुस्त राखण्यास मदत करते.

बिजवे पुढे म्हणाले की, शर्यतीसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ५ कि.मी.चा ट्रॅक निश्चित करण्यात आला आहे. या ६० दिवसांच्या शर्यतीत भाग घेणाऱ्या सर्व धावपटूंना वेळचे प्रशस्तीपत्रक, शर्यत पूर्ण केल्याचे पदक मिळणार आहे. शर्यती दरम्यान आवश्यक टायमिंग चिप आणि ऑन रुट सहाय्य मिळणार आहे. हा मार्ग एम्सने जागतिक अॅथलेटिक्सच्या माध्यमातून प्रमाणित करून घेतला आहे. धावण्यासाठी तारखेचे बंधन नाही. तुम्ही कोणत्याही दिवशी येऊन धावू शकता. यामध्ये एखाद्या धावपटूने ६० दिवसांत आठ दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस धावल्यास त्याला अल्ट्रा डायनामो शिर्षक असलेले स्मृतिचिन्ह मिळेल.

Leave a Reply

%d bloggers like this: