अभाविप कडून स्त्रीशक्ती दिनानिमित्त माणिकर्णीका दौड

पुणे: 19 नोव्हेंबर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची जयंती झाशीची राणी स्त्री शक्तीचे एक विराट दर्शन म्हणून ओळखल्या जातात. तहहयात आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी लढा देणाऱ्या १८५७ च्या स्वातंत्र्य समरातील एक अग्रणी रणरागिणी म्हणून राणी लक्ष्मीबाई सर्व परिचित आहेत. राणी लक्ष्मीबाई यांच्या जयंतीनिमित्त अभाविपकडून दरवर्षी 19 नोव्हेंबर स्त्री शक्ती दिवस म्हणून साजरा केला जातो. आज अभाविप मध्यपुणे भागाकडून स्त्री शक्ती दिनानिमित्त मनकर्णिका दौडीचे आयोजन करण्यात आले होते.

या दौडीची सुरवात लाल महाल येथून जिजाऊ यांच्या पुतळ्याला वंदन करून सुरू झाली. मनपा बिल्डिंग वरून बालगंधर्व येथील झाशीच्या राणीच्या पुतळ्या ला पुष्पहार अर्पण करून दौडीची सांगता झाली. रन फॉर वुमन्स हिरोइझम हा दौडी मागचा हेतू होता. या दौडीची नियोजनापासून सांगतेपर्यंत सर्व कामांमध्ये विद्यार्थिनींचा च सहभाग होता. समाजातील स्त्रीयांचे नेतृत्व पुढे येण्यासाठी या दौडी चे आयोजन केले होते. ही दौड समाजात विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांना व विद्यार्थिनींना प्रेरणा देईल व महिला सशक्तिकरण व सबलीकरण यावर अभाविप कार्यकर्ते काम करत राहतील अशी भूमिका महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी यावेळी मांडली.

Leave a Reply

%d bloggers like this: