त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ऐतिहासिक लाल महालामध्ये भव्य दीपोत्सव आयोजित

पुणे : त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जय श्रीराम ग्रुप तर्फे ऐतिहासिक लाल महालामध्ये भव्य दीपोत्सव आयोजित केला होता. या कार्यक्रमाला अभाविपचे पुणे महानगर मंत्री शुभंकर बचाल ,व अभाविपचे कार्यकर्ते ,व पुणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने उपस्थित होते.

हेमंत रासने म्हणाले,आज त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जय श्रीराम ग्रुप तर्फे ऐतिहासिक लाल महालामध्ये भव्य दीपोत्सव आयोजित दरवर्षी केला जातो. जय श्रीराम ग्रुप हा दीपोत्सव करून हा एक छान उपक्रम करत आहे. लाल महालामध्ये दीपोत्सव जय श्रीराम ग्रुप ने आयोजित केला आहे. त्यामुळे नागरिकांना हा दीपोत्सव बघता येणार आहे. असे हेमंत रासने म्हणाले.
शुभंकर बचाल म्हणाले, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त जय श्रीराम ग्रुप तर्फे ऐतिहासिक लाल महालामध्ये भव्य दीपोत्सव कार्यक्रमास आज मला या कार्यक्रमात निमंत्रित केले म्हणून मी जय श्रीराम ग्रुप चे आभार मानतो असे शुभंकर बचाल म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: