विद्यानगर येथे बालदिनास उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे : -विद्यानगर येथिल चलवादी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून व ऍड.रेणुका चलवादी यांच्या वतीने पुणे इंटरनॅशनल स्कूल अँड ज्यू.कॉलेजमध्ये बालदिन उत्साहात संपन्न झाला. सदर बालमेळाव्याचे उद्घाटन पुणे महापालिकाचे सहायक आयुक्त वैभव कडलक यांचे हस्ते करण्यात आले.
यावेळी पुणे इंटरनॅशनल स्कूलचे चेअरमन हुलगेश चलवादी ,निवडणूक नायब तहसीलदार स्मिता कुलकर्णी ,पाणी पुरवठा अधिकारी सापळे साहेब ,दिलीप कुसाळे ,प्राचार्या स्मिता लोंढे ,सायली शिंदे आदी उपस्थित होते. मेळाव्यामध्ये विविध प्रकारची खेळणी ,गाणी ,नृत्य ,खाऊचे स्टॉल ,ऑर्केस्ट्रा आदी ठेवण्यात आले होते .सलग चार दिवस चालणाऱ्या या मेळाव्याचे मुख्य आकर्षण ठरले ते शिने अभिनेत्री वर्षा पवार , ज्यूनियर जॉनी लिव्हर ,ज्यू .रजनीकांत ,ज्यू.देवानंद यांनी मुलांना मार्गदर्शन करून त्यांच्या समवेत मनोरंजन व नृत्य केले . सर्व मुलांकडून लकी ड्रॉ कुपन घेऊन त्यामधून वीस मुलांना आकर्षक बक्षिसे रेणुका चलवादी व हुलगेश चलवादी यांच्या हस्ते देण्यात आली . कोरोना नंतर अनेक महिन्यानंतर मुलांनी आश्या मोठया कार्यक्रमात सहभागी होऊन आनंद व्यक्त केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले .
