कोंढवा येथे सुमारे साडे तीन कोटी रुपये खर्च करून अन्न व अन्न पदार्थांची कोट्यावधीची प्रयोगशाळा धूळखात पडल्याचा विवेक वेलणकर यांचा आरोप

 

पुणे:पुणे:पुणेमहापालिकेने २०११ मध्ये कोंढवा येथे सुमारे साडे तीन कोटी रुपये खर्च करून अन्न व अन्न पदार्थांची तपासणीसाठी प्रयोगशाळा उभारली. २०१४ मध्ये अत्याधुनिक उपकरणे व बांधकाम यासाठी सुमारे ८.७० कोटी रुपये खर्च केले. ही प्रयोगशाळा एका संस्थेला चालविण्यासाठी देण्यात आली. त्यामध्ये पाच वर्षा केवळ १२ लाख ७८ हजार रुपये मिळाले. त्यात महापालिकेला मोठे नुकसान झाले. यानंतर महापालिकेने पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबवून ही प्रयोगशाळा चालविण्यासाठी प्रस्ताव सादर केला.

या नवीन प्रस्तावाद्वारे महापालिकेला दरमहा अडीच लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली आहे, त्यानंतर मंजुरीसाठी हा प्रस्ताव मुख्यसभेकडे गेला आहे. गेल्या २६ महिन्यात शेकडो प्रस्ताव मुख्यसभेत मंजूर करण्यात आले, पण प्रयोगशाळेचा प्रस्ताव वारंवार पुढे ढकलण्यात आला आहे. गेल्या महिन्यात आॅक्टोबर महिन्याच्या कार्यपत्रिकेवरही हा विषय होता. मध्यरात्री १२ पर्यंत मुख्यसभा चालली पण हा विषय मंजूर केला नाही. त्यामुळे २६ महिन्यात ६५ लाखाचे उत्पन्न बुडाले आहे.

नवीन प्रस्तावाद्वारे महापालिकेला दरमहा अडीच लाख रुपये उत्पन्न मिळणार आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये या प्रस्तावास स्थायी समितीने मान्यता दिली आहे, त्यानंतर मंजुरीसाठी हा प्रस्ताव मुख्यसभेकडे गेला आहे. गेल्या २६ महिन्यात शेकडो प्रस्ताव मुख्यसभेत मंजूर करण्यात आले, पण प्रयोगशाळेचा प्रस्ताव वारंवार पुढे ढकलण्यात आला आहे. गेल्या महिन्यात आॅक्टोबर महिन्याच्या कार्यपत्रिकेवरही हा विषय होता. मध्यरात्री १२ पर्यंत मुख्यसभा चालली पण हा विषय मंजूर केला नाही. त्यामुळे २६ महिन्यात ६५ लाखाचे उत्पन्न बुडाले आहे.

पुणे महापालिकेने तब्बल साडे अकरा कोटी रुपये खर्च करून कोंढवा येथे अन्न व अन्न पदार्थ्यांची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळा उभारली. ही संस्था भाड्याने देऊन त्यातून दर महिन्याला अडीच लाख रुपये उत्पन्न मिळणार होते. मात्र, गेल्या २६ महिन्यापासून हा प्रस्ताव मुख्यसभेपुढे प्रलंबित असून देखील निर्णय घेण्यात आला नसल्याने ६५ लाख रुपयांचे उत्पन्न बुडाले आहेच, पण कोट्यावधीची यंत्रणा धुळखात पडली आहे.असा आरोप सजग नागरिक मंचचे विवेक वेलणकर यांनी केला आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: