केंद्रीय गृहमंत्री अमित शहा २६ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर

पुणे :पुणे महापालिका भवनातील हिरवळीवर छत्रपती शिवाजी महाराज स्मारक तयार केले जाणार असून, त्याचे भूमीपूजन आणि महापालिकेच्या नव्या इमारतीमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Union Home Minister Amit Shah) यांच्या हस्ते होणार आहे. अमित शहा हे २६ नोव्हेंबर रोजी पुणे दौऱ्यावर आहेत, त्यांचे इतर काही कार्यक्रम असल्याने महापालिकेतील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी अमित शहा यांनी या कार्यक्रमासाठी महापालिकेत यावे यासाठी फिल्डींग लावली होती. त्यानुसार इमेल देखील केला होता. त्यास दुजोरा मिळाला आहे.

पुणे महापालिकेची निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने भाजपने या निवडणुकीचे रणशिंग फुंकण्याची तयारी केली आहे. यासाठी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाच महापालिका भवनातील कार्यक्रमासाठी निमंत्रित केला आहे. २६ नोव्हेंबर रोजी दुपारी अमित शहा कार्यक्रमास येणार असल्याचे कळविण्यात आले आहे. (Union Home Minister Amit Shah to visit Pune on November 26) 

Leave a Reply

%d bloggers like this: