सारेगमपच्या मंचावर लिटिल चॅम्प्ससोबत कल्ला करण्यासाठी सज्ज होणार संजय जाधव आणि कौशल इनामदार

झी मराठी वरील लोकप्रिय ‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’च्या नवीन पर्वाला सुरुवाती पासूनच प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. हा तमाम महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा आणि संगीत प्रेमींचा अगदी लाडका कार्यक्रम आहे. त्यातील सर्व निरागस स्पर्धकांइतकाच गोड त्यांचा परफॉर्मन्स असतो. फक्त परीक्षक आणि प्रेक्षकच नाही तर मनोरंजन सृष्टीतील अनेक कलाकार देखील या छोट्या गायकांचे फॅन झाले आहेत. या कार्यक्रमात लोकप्रिय कलाकारांना निमंत्रित केले जाते आणि ते प्रेक्षकांनाही आवडत असते. येत्या आठवड्यात या मंचावर २ अगदी दिलखुलास व्यक्तिमत्व सज्ज होणार आहेत.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय जाधव आणि संगीत दिग्दर्शक कौशल इनामदार या मंचावर लिटिल चॅम्प्सच कौतुक करण्यासाठी उपस्थित असणार आहे. या दोघांच्या उपस्थितीत लिटिल चॅम्प्सने एका पेक्षा एक धमाकेदार परफॉर्मन्स दिले. गेल्याच आठवड्यात कॉलबॅक राउंड मध्ये रागिणी शिंदे हिची स्पर्धेत पुन्हा एन्ट्री झाली. तसेच गौरी गोसावी, ओंकार कानेटकर, पलाक्षी दीक्षित यांनी १० पेक्षा जास्त गोल्डन तिकिट्स मिळवून फिनाले मध्ये आपलं स्थान पक्क केलं आहे. त्यामुळे या आठवडयात कुठला लिटिल चॅम्प गोल्डन तिकीट मिळवेल आणि कुठला लिटिल चॅम्पचा स्पर्धेतील प्रवास थांबेल हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

Leave a Reply

%d bloggers like this: