गणेश खिंड रस्त्याचे रुंदीकरण तातडीने करा पीएमआरडीएचे महापालिकेला पत्र

पुणे:गणेशखिंड रस्त्याचे विका्यानुसार तातडीने रूंदीकरण करावे, अशी सूचना पीएमआरडीएने महापालिकेला पत्राद्वारे केली आहे. हे काम हिंजवडी ते शिवाजीनगर प्रस्तावित मेट्रो मार्गाच्या कामासह सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकातील बहुमजली उड्डाणपूलाचे काम सुरू करण्यापूर्वी करण्याचेही पत्रात सूचीत करण्यात आले आहे.
गणेश खिंड रस्त्यावरील उड्डाणपूल मागील वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये पाडण्यात आला. त्यानंतर अद्याप या ठिकाणच्या नवीन पूलाचे काम सुरू करण्यात आलेले नाही. दुसरीकडे दररोज सकाळी व सायंकाळी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतुककोंडी होत आहे. त्यातच आता नवीन पुलाचे व मेट्रो मार्गाचे काम सुरू करताना विद्यापीठ चौक ते सेनापती बापट चौका पर्यंत रस्त्याच्या मध्यभागी 11 मीटर रूंदीचे बॅरीकेडस लावण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूस जमतेम दोन ते अडीच लेन जागा वाहनांच्या वाहतूकीसाठी उपलब्ध होणार आहे. या शिवाय, सेनापती बापट चौक ते शिवाजीनगर पर्यंत रस्त्याच्या मध्ये 9 मीटर बॅरीकेडस लावण्यात येणार आहे. परिणामी सायकल मार्ग, पादचारी मार्ग जाता या ठिकाणी केवळ 2 लेनचा रस्ता उपलब्ध होणार आहे.

या पार्श्वभूमीवर रस्ता रूंदीकरण झाल्याशिवाय मेट्रोचे काम सुरू करणे शक्य होणार नाही. ही बाब लक्षात या कामाबाबत नुकत्याच विभागीय आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत महापालिकेच्या विकास आराखडयातील रूंदीकरणा प्रमाणे पहिल्या टप्प्यात विद्यापीठ चौक ते सेनापती बापट चौक या 250 मीटर लांबीच्या रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या शासकीय संस्थाची जागा महापालिकेने तातडीनं ताब्यात घ्यावी तसेच या भागातील सेवा वाहिन्या स्थलांतर करून प्राधिकरणाच्या माध्यमातून रूंदीकरणाचे काम करावे, असे आदेश विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिले आहेत.
तर रूंदीकरण झाल्याशिवाय काम करू नये, अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधींची आहे. त्यामुळे महापालिकेने आधी रस्ता रूंदीकरण करून द्यावा, त्यानंतरच काम सुरू करणे शक्य असल्याचे पत्र पीएमआरडीएने महापालिकेला दिले आहे

Leave a Reply

%d bloggers like this: