नागरिकांची प्रशासकीय कामे विनाअडथळा पूर्ण होण्यासाठी जनसंपर्क कार्यालये महत्वाची – सचिन अहिर

पुणे: कोरोना काळात ज्यावेळी नातेवाईक एकमेकांना भेटायला मदत करयाला तयार नव्हते अशावेळी शिवसैनिक नागरिकांच्या मदतीला धावून जात होते. केवळ शिवसैनिकच नव्हे तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे हे देखील कुटुंबप्रमुखाची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत होते. यावरूनच दिसते की, शिवसेनेचे कार्यकर्तेच नव्हे तर नेत्यांची सुद्धा नाळ जनतेशी जुळलेली आहे. मंडळातील कार्यकर्ता जेव्हा कार्यालयाच्या माध्यमातून समाजसेवा करायचे ठरवतो तेंव्हा समाज त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो. शिवसेनेचे जनसंपर्क कार्यालय हे केवळ कार्यालय नसून न्यायमंदीर असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण व्हावी असेच उत्तम कार्य शिवसैनिकांकडून अपेक्षीत असल्याचे मत शिवसेना उपनेते व पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी व्यक्त केले. अहिर यांच्या हस्ते पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे विभागप्रमुख राजेश मोरे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.

पूरपरिस्थिती असो की लसीकरण केंद्र सरकार राज्याच्या बाबतीत दुटप्पी भूमिका घेत आहे. शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक सामाजिक कार्यात प्रयत्नशील राहणारा आहे. नागरिकांची प्रशासकीय कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी जनसंपर्क कार्यालये महत्वाची आहेत. तसेच पक्षाचे ध्येयधोरणे तसेच सरकारी योजना या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून सर्वसाधारण नागरिकांपर्यंत पोहचवणे गरजेचे असल्याचे सचिन अहिर म्हणाले.

यावेळी सहसंपर्क प्रमुख अदित्य शिरोडकर, अजयजी भोसले, शहरप्रमुख संजयजी मोरे, गजानन थरकुडे, उपशहर प्रमुख डॉ. अमोलजी देवळेकर, नगरसेवक पृथ्वीराजदादा सुतार, नगरसेविका पल्लवीताई जावळे, विधानसभा प्रमुख अभयजी वाघमारे उपस्थित होते.

आगामी काळात नागरिकांना एखाद्या गोष्टीसाठी मनपा कार्यालय किंवा क्षेत्रीय कार्यालायात चकरा मारायला लागू नयेत यासाठी जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. शिवसेना 80 टक्के समाजकारण आणि गरज पडल्यास 20 टक्के राजकारण करते. सोमवार पेठ परिसरात सुरु करण्यात आलेल्या जनसंपर्क कार्यालयात सुद्धा जनतेचे प्रश्न सोडविण्याला प्राधान्य देण्यात येईल असे प्रतिपादन राजेश मोरे यांनी केले.

Leave a Reply

%d bloggers like this: