आळंदी येथे भाजप वकील आघाडीच्या आँनलाईन लिगल सेवा कार्यालयाचे उद्घाटन

आळंदी:अलंकापुरी येथे आँनलाईन लिगल सर्व्हिस सेवा ॲड. एस. एस आघाव सर, ॲड एन. एच. जायभाये सर, ॲड नाडे यांच्या मार्फत आँनलाईन लिगल सर्व्हिस या सेवेची सुरुवात पहिल्यांदाच या शहरामध्ये सुरुवात करण्यात आली.

यासेवेची सुरुवात भाजपाचे वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. संजय सावंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी ॲड. संजय सावंत यांनी या संकल्पनेचे कोतुक केले अशी संकल्पना सर्व तालुक्यामध्ये होणे खुप गरजेचे आहे पुणे शहाराला सर्व दिशेने ग्रामीण पट्टा असुन सर्व तालुका स्तरावर जर अशी संकल्पना राबवली तर जनसामान्याना शहरा मध्ये जाण्याऐवजी ग्रामीण भागातच यासुविधेचा लाभ झाला तर पैसा आणि वेळ वाचेल असे लोकांना संबोदताना सांगितले. तसेच ॲड सावंत पाटील यांनी हि सुविधा सुलभतेने आळंदी कराना माऊली आँनलाईन सर्व्हिस मार्फत मिळेल अशी आशा बाळगली..

यावेळी प्रमुख उपस्थिती आळंदी नगरीचे भाजपाचे ज्येष्ठ नेते उद्योगपती अविनाश शेठ बोरुंदीया, पञकार अर्जुन मेदनकर, प्राचार्य पाडुरंग मिसाळ सर, विलास सांगळे, सामाजिक कार्यकर्ते माऊली शेट थोरवे, ॲड महेश घोडके, ॲड सागर नेवसे, बाळासाहेब पालवे, के डी पालवे, उद्यव डिगोळे, गजानन नागरे, आदी मान्यवर उपस्थित होते..

कार्यक्रमाची सांगता करताना ॲड एस एस आघाव यांनी विशेष आभार भाजपाचे वकील आघाडीचे जिल्हाध्यक्ष ॲड. संजय सावंत पाटील, अविशेठ बोरुंदीया व प्राचार्य मिसाळ यांच्या सोबतच सर्वाचे आभार मानले.,.,

Leave a Reply

%d bloggers like this: