big boss Marathi – उत्कर्षसाठी मिराने पुन्हा नाकारलं टॅम्प्टेशन

मैत्री म्हंटली की एकमेकांसाठी जीव देणा-या मित्रांची आपण व्याख्या करतो. मात्र बिगबॉसच्या घरात वरवर चांगले वाटणारे हे मित्र टास्कसाठी एकमेकांचा जीव देखील घेतील, अशी परिस्थिती असते. पण, बिगबॉस मराठी ३ च्या घरात एक अशी स्पर्धक आहे, जी मैत्रीण म्हणून प्रत्येकाला हवीहवीशी वाटेल!! ती स्पर्धक म्हणजे मीरा जगन्नाथ. नुकत्याच झालेल्या टेम्पटेशन रूम टास्कमध्ये जोडीदार उत्कर्ष शिंदेला संधी देऊन मीराने पुन्हा एकदा आपल्या मैत्रीचा आयाम रचला.   

बिगबॉस मराठी ३ च्या पहिल्याच आठवड्यात मीराला टेम्पटेशन रूममध्ये जाण्याची संधी मिळाली होती, त्यावेळी देखील मीराने कॅप्टन बनलेल्या उत्कर्ष शिंदेची कॅप्टनशीप हिरावून घेत, स्वत:ला सेव करण्याचे टेम्पटेशन स्वीकारले नव्हते. तेव्हापासून आतापर्यत बीगबॉसच्या घरातली अनेक समीकरणं बदलली आहेत, पण तरी देखील मीराने खेळापेक्षा मैत्रीच्या नात्याला अधिक महत्व दिलेलं दिसून आले. बिगबॉसच्या घरात पहिल्या दिवसापासूनच मीरा चर्चेचा विषय ठरली आहे. एरवी टास्क जिंकण्यासाठी साम दाम दंड भेद चा वापर करणारी मिरा, घरातल्या सदस्यांसोबत कीतीही वाद घालताना दिसली तरी मित्रांसाठी विकेंड च्या वार मध्ये महेश मांजरेकर सरांचा ओरडा खाण्यासाठी देखील तयार असते. मीराचा हाच गूण तिच्या चाहत्यांना आवडत आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: