शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनाने इतिहासातील एक पान गळून पडले –  डॉ. पं. नंदकिशोर कपोते

पुणे:महाराष्ट्र भूषण बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्याने महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली आहे व एक न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांना शत् शत् नमन, ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो अशी श्रद्धांजली डॉ. पं. नंदकिशोर कपोते यांनी बाबासाहेब पुरंदरे यांना अर्पण केली.

नंदकिशोर कपोटे म्हणाले,माझी बाबासाहेबांशी पहिली भेट (१९९१) माझा विद्यार्थी उत्तम बिराजदार  याचा नृत्याचा कार्यक्रम होता त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे व मी प्रमुख पाहुणे होतो. त्यावेळी आमचे खूप मनमोकळेपणाने बोलणे झाले. त्यांचे राहणीमान अत्यंत साधे होते. त्यांनी त्यावेळी माझे नृत्य पाहण्याची इच्छा व्यक्त केली. आणि त्यानंतर बाबासाहेबांनी पूणे फेस्टिवल मध्ये माझे नृत्य पाहिले व मनापासून कौतुक केले व आशिर्वाद दिले. २०१९ मध्ये माझे गुरू पं. बिरजू महाराजजी पुण्यात माझ्याकडे आले होते तेव्हा एका कार्यक्रमात बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते महाराजजींना पुरस्कार देण्यात आला होता. तेव्हाही माझी त्यांनी आवर्जून विचारपूस केली,आशिर्वाद दिले. ही त्यांची अखेरची भेट ठरली. असे  डॉ. पं. नंदकिशोर कपोते  यांनी सांगितले. 

Leave a Reply

%d bloggers like this: