समाजाने-कुटुंबाने स्त्रियांप्रती संवेदनशील होणे गरजेचे – शीतल कोटमाळे

 

पुणे : समाजाने-कुटुंबाने स्त्रियांप्रती संवेदनशील असणे, त्यांना योग्य आणि पोषणयुक्त आहार मिळण्यासाठी कुटुंबालातील किमान एकाच्या तरी हाताला नियमित काम आणि कामाला योग्य दाम मिळणे, रेशनवर कुटुंबाच्या गरजेनुसार स्वस्त आणि चांगल्या दर्जाचे अन्नधान्य उपलब्ध करून देणे. आरोग्य सेवांमध्येही गरजेनुसार लोहाच्या गोळ्या देण्याबरोबरच आहारविषयक-रक्तपांढरीबाबत समाजाला सजग-शिक्षित करणे यातूनच समाजातील महत्त्वाचा घटक असलेल्या स्त्रिया सुदृढ राहू शकतात. अशा विविधांगी उपयातूनच ऍनिमियातून त्यांची सुटका होऊ शकेल. अशी चर्चा अभिव्यक्ती आयोजित  ‘ती’चे आरोग्य या कार्यक्रमात करण्यात आली.

अभिव्यक्तीच्या कार्यकर्त्या शीतल कोटमाळे आणि शकुंतला सविता यांनी ही चर्चा घेतली. त्यांनी पुढे सांगितले की थकवा येणे, त्वचा पांढरी पडणे, अशक्तपणा जाणवणे, सांधे दुखणे ही लक्षणे स्त्रियांमध्ये सर्रास आढळतात त्याला कारणीभूत त्याचे हिमोग्लोबिन कमी असणे- म्हणजेच त्यांना अ‍ॅनिमिया असणे यात आहे. अ‍ॅनिमिया किंवा हिमोग्लोबिनची कमतरता म्हणजे काय? हिमोग्लोबीन हा शरीरातील सर्वांत महत्वाचा घटक आहे. रक्त कोशिकांमध्ये उपलब्ध असलेले लोहयुक्त प्रोटिन म्हणजे हिमोग्लोबीन. शरीरातील ऑक्सिजनच्या प्रवाहाला संतुलित करण्याचे काम हे प्रोटिन करतात.

फुप्पुसांच्या आतपर्यंत ऑक्सिजन पोहोचविण्याचे काम त्यांना करावे लागते. जीवन कोशिका योग्य प्रकारे काम करू शकतील यावर हिमोग्लोबीन जास्त काम करते. स्त्रियांमध्ये हिमोग्लोबीनचे प्रमाण 12 ते 14 असले पाहिजे. परंतु भारतात दर 10 पैकी किमान 6 स्त्रिया/मुली अ‍ॅनिमिक आहेत. याचे त्यांच्या दैनंदिन आयुष्यावर-मासिक पाळीवर विपरीत परिणाम होत असतात. अशातच त्या मुलांना जन्मही देतात. गरिबी-बेरोजगारी यामुळे पोटभर जेवण मिळण्याची वानवा आहे. गरिबी बेरोजगारी यामुळे डाळी, हिरव्या पालेभाज्या, मांस मच्छी विकत घेता येत नाही, रेशनवर पुरेसे धान्य मिळत नाही. पुरुषसत्ताक-पुरुषप्रधान समाजात पुरुषांचे-मुलांचे जेवण झाल्यावर उरलेले अन्न आणि बहुतांश वेळेला शिळे अन्न स्त्रियांच्या वाट्याला येते.

आरोग्य सेवा स्त्रीबाबत संवेदनशील असणे-आहारविषयक-रक्तपांढरीबाबत समाजाला सजग-शिक्षित करणे, हे करता येऊ शकते. तातडीचे उपाय म्हणून आहारात लोहयुक्त भाज्या-फळे याविषयीही माहिती दिली गेली.

यावेळी हिमोग्लोबिन कमी असताना झालेले त्रास आणि हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी केलेलं उपाय यावर अनेक मुलींनी-महिलांनी आपले अनुभव मांडले. अभिव्यक्ती दर महिन्याला असे कार्यक्रम आयोजित करत असते.

Leave a Reply

%d bloggers like this: