लहुजी वस्ताद साळवे यांना भारतरत्न मिळण्यासाठी पाठपुरावा करणार – नारायण स्वामी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री

पुणे : स्वातंत्र लढ्यातील क्रांतिकारकांना प्रशिक्षण देऊन लढा उभारणारे क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना देशाचा सर्वोच्च असा भारतरत्न सन्मान मिळण्यासाठी आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री नारायण स्वामी यांनी पुण्यातील लहुजी साळवे यांना जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन सभेत जाहीर केले.

पुढे ते म्हणाले की महात्मा फुले ,वासुदेव बळवंत फडके ,लोकमान्य टिळक आणि अनेक क्रांतिकारक यांना लहुजी वस्ताद गुरुस्थानी होते .परंतु इतिहासाने योग्य प्रमाणात दखल घेतली नाही.त्यामुळे लहुजी वस्ताद यांचे कार्य जगभर पोहचवणे हे समाजाचे आणि आजच्या पिढीचे कर्तव्य असल्याचे स्वामी म्हणाले .
स्वामी हे पुण्यात क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांना अभिवादन करण्यासाठी आले होते .
या अभिवादन सभेचे आयोजन आद्यक्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारक समिती ट्रस्ट संगमवाडी पुणे च्या वतीने करण्यात आले होते.

प्रास्ताविक भाषणात ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष अशोक लोखंडे यांनी संगमवाडी येथील राष्ट्रीय स्मारकाच्या कामाविषयी माहिती सांगितली तसेच गेल्या वीस वर्षांपासून
ट्रस्ट च्या कार्याची माहिती दिली.यावेळी केंद्रीय मंत्री नारायण स्वामी यांच्या हस्ते क्रंतीगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले .
इतिहास संशोधक प्रा .सुहास नाईक यांनी लहुजी वस्ताद साळवे यांच्या मूळ फोटोची निगेटिव्ह व फोटो उपलब्ध झाल्याचे सांगितले .तसेच लहुजी वस्ताद साळवे यांच्या कार्यावर संशोधन पूर्ण केल्याचे सांगून लवकरच ग्रंथ रूपाने उपलब्ध होणार असल्याचे जाहीर केले.

या अभिवादन सभेस दलीत महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. मच्छिंद्र सकटे ,आमदार सुनील कांबळे ,माजी आमदार सुधाकर भालेराव ,लोकशाहीर आण्णा भाऊ साठे विकास महामंडलाचे माजी अध्यक्ष अमित गोरखे ,स्मारक समितीचे संस्थापक अध्यक्ष अशोक लोखंडे ,नगरसेविका वर्षा साठे ,नगरसेविका स्वाती लोखंडे , नगरसेविका अनुराधा गोरखे, डेमॉक्रटिक पार्टी ऑफ इंडिया चे संस्थापक अध्यक्ष प्रा.सुकुमार कांबळे ,सुनील वारे ,सुभाष मातंग ,विकास सातारकर ,भास्कर नेटके,रामदास साळवे यासह पुणे शहरातील विविध पक्ष संघटनाचे नेते ,कार्यकर्ते व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Leave a Reply

%d bloggers like this: