थुकरट वाडीत देशमुख कुटुंबीयांची गर्दी

कसे आहात मंडळी मजेत ना? आणि हसताय ना? असा आपुलकीने विचारत वर्षानुवर्षे प्रेक्षकांचा अविरत आणि सातत्याने भरभरून मनोरंजन करणारी टीम म्हणजे ‘चला हवा येऊ द्या’ची. डॉक्टर निलेश साबळे, भाऊ कदम, भारत गणेशपुरे श्रेया बुगडे, सागर कारंडे, कुशल बद्रिके हे सहा अवलिया इतर कलाकारांसोबत अनेक विनोदी स्किट सादर करत आज पर्यंत प्रेक्षकांच्या गळ्यातला ताईत बनले आहेत. या मंचावर प्रेक्षकांचे आवडते कलाकार देखील हास्याचा डोस अनुभवण्यासाठी सज्ज होतात.

या आठवड्यात झी मराठीवरील लोकप्रिय मालिका तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेतील कलाकारांची फौज थुकरट वाडीत सज्ज होणार आहे. मालिकेची संपूर्ण टीम चला हवा येऊ द्या मध्ये सज्ज झाल्यावर थुकरट वाडीची देखील मालिका प्रेक्षकांना पाहायला मिळते. त्यामुळे चला हवा येऊ द्या मधील सगळे विनोदवीर हे तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेवर एक विनोदी प्रहसन सादर करणार आहेत. सिड आणि अदितीच्या भूमिकेत श्रेया बुगडे आणि भाऊ कदम सगळ्यांना हसून हसून लोटपोट करण्यास भाग पडणार आहेत. त्यामुळे पाहायला विसरू नका ‘चला हवा येऊ’ द्या सोमवार ते बुधवार रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.

Leave a Reply

%d bloggers like this: