महागाई विरोधातील जनजागरण अभियान जिल्ह्यात यशस्वी करू – श्रीरंग चव्हाण


सातारा – केंद्रातील भाजप सरकारने कृत्रीम महागाई वाढवून देशातील अर्थव्यवस्था उध्वस्त करून जनतेला जगणे मुश्किल केले आहे,त्याबाबत जनतेत जनजागृती करण्यासाठी राज्यभरात जनजागरण अभियान राबविण्यात येणार आहे,सातारा जिल्ह्यातील सर्व तालुक्यात हे जनजागरण अभियान काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन केंद्र सरकारने केलेल्या कृत्रीम महागाई विरोधातील यशस्वी करून मोदी सरकार हटावचा संदेश पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंती दिनापासून सम्पूर्ण देशभर देऊया असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव व जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण यांनी आज सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीत या अभियानाच्या नियोजन बैठकीत बोलताना केले,

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशानुसार या महागाई विरोधात आधुनिक भारताचे शिल्पकार, माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल यांच्या जयंतीदिनापासून १४ ते २९ नोव्हेंबर पर्यंत राज्यभर जनजागरण अभियान राबविण्यात येणार आहे tychya नियोजन करण्याबाबत आज सातारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली होती यावेळी कार्याध्यक्ष ऍड विजयराव कणसे,जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई,प्रदेश प्रतिनिधी अनवर पाशाखान, बाबुराव शिंदें,युवकअध्यक्ष विराज शिंदे,महिला अध्यक्षधनश्रीताई महाडिक,अनु जाती जमाती अध्यक्ष मनोजकुमार तपासे,मनोहर शिंदें, रजनीताई पवार आदी प्रमुख उपस्थिती होते. 

यावेळी जनजागरण अभियान बाबत बोलताना चव्हाण यांनी सांगितले की,१४ नोव्हेंबर पासून होणाऱ्या जनजागरण अभियानात जिह्यातील सर्व ज्येष्ठ नेत्यांसह जिल्हा प्रभारू,प्रदेश पदाधिकारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन पदयात्रा काढून महागाई विरोधात लोकांमध्ये जनजागृती कररून गाव व खेड्यात जाऊन मुक्काम जर्सयचा आहे, हे अभियान पंधरवड्यात वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून राबवायचे आहेत या अभियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकापर्यंत पोहचून मोदी सरकारने केकेल्या महागाईच्या विरोधात व अर्थव्यवस्थेची दुरवस्था याबाबत आपण जनतेला जागेकरायचे आहे
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ सुरेश जाधाव यांनी हे अभियान जिल्ह्यातील आमचे सर्व पदाधिकारी यशस्वीपणे राबवतील अशी गवाहू दिली, जनजागरण अभियानाची सुरुवात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती दिवशी करण्यात येईल व १५ नोव्हेंबर रोजी माजी. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थितीत कराड ,सातारा,कोरेगाव या तालुक्यातुन करण्यात येणार आहे. 
यावेळी नवनिर्वाचित जिल्हा प्रभारी श्रीरंग चव्हाण यांचा सत्कार व स्वागत जिल्हाध्यक्ष दि सुरेशराव जाधव यांचे हस्ते करण्यात आला, यावेळी पुणे जिल्ह्याचे नेते सोपानराव म्हस्के, विक्रांत भोर,ऍड दत्तात्रय धनावडे, अमर करंजे,रवी भिलारे, विक्रम तरडे,सुदाम दीक्षित,रजिया शेख, बाळासाहेब शिरसाट आदी उपस्थित होते

Leave a Reply

%d bloggers like this: