एसटी कर्मचाऱ्यांच्या संपास अभाविप चा पाठिंबा

पुणे: गेल्या 73 वर्षापासून अभाविप शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात काम करत आहे. मागच्या अनेक वर्षांपासून एसटी कर्मचारी आपल्या मागण्यांबाबत राज्य शासनाशी चर्चा करत आले आहेत. ३-४ काही दिवसापासून एसटी कर्मचारी संपावर गेले असून बस स्थानकाबाहेर राज्य सरकार विरोधात आंदोलन करत आहेत.35 कर्मचाऱ्यांनी आत्महत्येचं पाऊल उचलले आहे तरी अजूनही राज्य सरकार याकडे दुर्लक्ष करत असून या मुळे सर्वसामान्य नागरिकांची, विद्यार्थ्यांची हेळसांड होत आहे. महाविद्यालय सुरू झाल्यानंतर अनेक विद्यार्थी हे संपामुळे ऑफलाइन शिक्षणापासून वंचित राहत आहेत म्हणून अभाविपने एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला आहे.

काल अभाविप कार्यकर्त्यांनी राज्यभरात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला पाठिंबा म्हणून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले होते. तसेच आज दिनांक 12 नोव्हेंबर या दिवशी स्वारगेट व वाकडेवाडी बस स्थनकावर जाऊन तेथे सुरू असलेल्या संपास पाठिंबा दिला व तेथील कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.कर्मचाऱ्यांशी चर्चा करु एकत्रित पणे न्याय मिळण्यासाठी सैविधानिक पद्धतीने आंदोलन करताना सर्व विद्यार्थी आपल्याला पाठिंबा देतील असे आश्वासन कार्यकर्त्यांनी दिले आहे.
या वेळी अभाविप पुणे विभाग संघटन मंत्री शुभम अग्रवाल महानगर सहमंत्री सोहम नारकर, अमोल देशपांडे ,शुभम बावचकर व अभाविप चे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

%d bloggers like this: