नोशन प्रेस मराठी पुस्तक प्रकाशन व्यवसायात करणार पदार्पण

मुंबई : भारतातील सर्वात मोठे पुस्‍तक प्रकाशन व्‍यासपीठ नोशन प्रेसने मराठी भाषा प्रकाशनामध्‍ये प्रवेशाची घोषणा केली आहे. आपली पुस्‍तके प्रकाशित करण्‍यासोबत जगभरातील वाचकांपर्यंत पोहोचण्‍याची महत्त्वाकांक्षा असलेल्‍या मराठी भाषिक लेखकांसाठी ही उत्तम बातमी आहे. लेखक वापरण्‍यास सुलभ अशा ऑनलाइन साधनांच्‍या माध्‍यमातून फक्‍त ३ पाय-यांमध्‍ये त्‍यांची पुस्‍तके प्रकाशित करून स्‍टोअर्समध्‍ये पाठवू शकतात. लेखकांना त्‍यांच्‍या प्रकाशन प्रक्रियेच्‍या कोणत्‍याही टप्‍प्‍यावर चॅट व ईमेलच्‍या माध्‍यमातून साह्य केले जाते.

हे व्‍यासपीठ हिंदी, तमिळ, बंगाली व मल्‍याळममधील पुस्‍तकांना देखील पाठिंबा देते. याचा अर्थ असा कीभारतीय लेखक आता पेपरबॅक व ईबुक स्‍वरूपात त्‍यांच्‍या पसंतीच्‍या भाषेमध्‍ये त्‍यांच्‍या कथा प्रकाशित करू शकतात, जे १०० हून अधिक देशांमधील वाचकांसाठी विकले जाऊ शकतात.

लाँचप्रसंगी बोलताना नोशन प्रेसचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी नवीन वल्‍साकुमार म्‍हणाले, भारतीय भाषांमध्‍ये पुस्‍तकांसाठी मागणी नेहमीच प्रचंड राहिली आहे आणि आगामी वर्षांमध्‍ये मागणी अपवादात्‍मकरित्‍या वाढेल. तसेच वाचक वाचणा-या पुस्‍तकांमध्‍ये देखील संपन्‍न विविधता आहे. प्रादेशिक कविता, काल्‍पनिक कादंब-या, स्‍वावलंबन किंवा शैक्षणिक पुस्‍तके अशी विविधता आहे. आम्‍हाला अशा क्षमतेसह बाजारपेठेमध्‍ये प्रवेश करण्‍याचा आनंद होत आहे. आम्‍ही जागतिक कथा सादर करण्‍याची आशा करतो, ज्‍या वाचकांना अद्वितीय संस्‍कृतीचा अनुभव देतील.

नोशन प्रेस पब्लिशिंग हे अद्वितीय डू-इट-युअरसेल्‍फ व्‍यासपीठ आहे. हे व्‍यासपीठ महत्त्वाकांक्षी लेखकांना फक्‍त ३० मिनिटांमध्‍ये सर्वोत्तम पुस्‍तके प्रकाशित करण्‍यामध्‍ये सक्षम करते. हे व्‍यासपीठ अनेक सुविधा देते, ज्‍यामध्‍ये सुरूवातीपासून शेवटपर्यंत प्रकाशन प्रक्रियेचा समावेश आहे. ज्‍यामुळे लेखकांना सर्जनशीलतेवर नियंत्रण ठेवता येते. नोशन प्रेस पब्लिशिंग व्‍यासपीठ वापरण्‍यामागील सर्वोत्तम भाग म्‍हणजे ते पूर्णत: मोफत आहे.

२०१२ मध्‍ये स्‍थापना आणि चेन्‍नईमध्‍ये मुख्‍यालय असलेल्‍या नोशन प्रेसमध्‍ये जगभरातील लेखक आहेत. कंपनीने यशस्‍वीरित्‍या ४०,००० हून अधिक पुस्‍तके प्रकाशित करण्‍यासोबत १५० हून अधिक देशांमध्‍ये त्‍यांची विक्री केली आहे. नवीन म्‍हणाले, नोशन प्रेसचा सर्वांसाठी कथा सांगण्‍याकरिता प्रकाशन प्रक्रिया उपलब्‍ध करून देण्‍याचा मनसुबा आहे. आम्‍ही अनेक संधी देण्‍याची आशा करतो, ज्‍यामुळे नवीन उदयोन्‍मुख लेखकांना वाचकत्‍वाच्‍या पूर्णत: नवीन विश्‍वामध्‍ये सामावून जाण्‍यास मिळेल. लेखन व वाचन भारतभरातील प्रत्‍येक व्‍यक्‍तीला उपलब्‍ध होतील, मग ती व्‍यक्‍ती कोणीही असो आणि ते कोणत्‍याही भाषेमध्‍ये बोलत असो, त्‍यांना उत्तम सुविधा मिळतील.

Leave a Reply

%d bloggers like this: