Wednesday, November 18, 2026
Latest NewsPUNE

आज पुणे शहरात कोरोनाचे नवीन 83 रुग्ण तर 71रुग्णांना डिस्चार्ज

पुणे : शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. आज रुग्णांची कमी असून शंभर पेक्षा कमी रुग्ण सापडले  आहेत. पुणे शहरामध्ये गेल्या 24 तासात 83 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 71 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5 लाख 5 हजार 2 इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4 लाख 95 हजार 212 इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 2 तर पुणे महापालिका हद्दी बाहेरील 4 रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9079 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहरामध्ये सध्या 711 रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. त्यापैकी 115 रुग्ण गंभीर आहेत. आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5686 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply