वल्लभ नगर आगार एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड चा जाहीर पाठिंबा.

पिंपरी :  पिंपरी चिंचवड वल्लभ नगर आगार येथे एस टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चालु आहे, संभाजी ब्रिगेड चे प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे व महासचिव सौरभ खेडेकर यांच्या सुचनेवरून या आंदोलन स्थळी आज संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे व संभाजी ब्रिगेड च्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी भेट दिली.व एस टी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी सहभाग झाले, संभाजी ब्रिगेड चे पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला आहे कारण संभाजी ब्रिगेड चा कार्यकर्ता जेथे आंदोलन करतो तेथे इतिहास घडवतो, असे मनोगत एस टी कर्मचारी मोहिते यांनी वेक्त केले.

आंदोलन करून मागण्या पूर्ण होत नसल्यामुळे शेवटी आत्महत्या करूनही एस टी कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार नसेल तर नक्कीच हे लोकशाहीला घातक आहे, याचा सर्वांनी विचार करावा, आणि सरकारने टोकाचं पाऊल उचलू नये आणि एस टी कर्मचाऱ्यांना आणि जनतेलाही टोकाचे पाऊल उचलायला लावू नये, ही संभाजी ब्रिगेड ची विनंती आहे, यावेळी आंदोलन स्थळी संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, उपाध्यक्ष,रणजित बिराजदार, कामगार आघाडी संघटक अंकुश हाके, महिला आघाडी जिल्ह्याध्यक्षा मोहिनी रणदिवे,संध्या माने, विजय कदम, सचिव निलेश ढगे, सरचिटणीस सनी उर्फ बाळू थोपटे, तालुकाध्यक्ष शिवाजी पावर, जिल्हाकार्याध्यक्ष साजिद सय्यद, तसेच एस टी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी संभाजी ब्रिगेड तर्फे कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन दरबारी विषय लावून धरू व मागण्या जो परेनंत पूर्ण होत नाही तो परेनंत ताकदीने लढू असा शब्द दिला. या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला. आता परेनंत तीस पेक्षा जास्त एस टी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे तरीही राज्य सरकारला आणि परिवहन मंत्र्यांना त्याच गांभीर्य नाही, राज्य शासनाने एस टी चे राज्यशासनात विलीनीकरण करावे तसेच कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या त्वरित मागण्या कराव्यात, व आत्महत्या करणाऱ्या एस टी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला प्रत्येकी पन्नास लाख आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी,अशी संभाजी ब्रिगेड ची मागणी आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: