fbpx
Sunday, May 19, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

मानेच्या उपचारासाठी मुख्यमंत्री रुग्णालयात दाखल

मुंबई : सातत्याने कामात व्यग्र असल्याने मानेच्या दुखण्याकडे दुर्लक्ष झाले असून आता मानेच्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एक निवेदनाद्वारे दिली आहे.

निवेदनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात, गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडे आपले जीवनचक्र सुरू राहावे, राज्यातली विकासकामे सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्याने प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झाले आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच.

पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीने डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन-तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे.

पुढे मुख्यमंत्री म्हणतात, कोरोना लसींच्या बाबतीत आपण १० कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या एवढीच विनंती करतो, असे आवाहनही ठाकरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading