fbpx
Friday, April 19, 2024
Latest NewsPUNE

एलन करियर इंस्टीट्यूट तर्फे विद्यार्थ्यांचा सन्मान

पुणे : विद्यार्थी आणि पालकांच्या उपस्थितीमध्ये एलनचे व्हिक्ट्री सेलीब्रेशन एलन मुंबईने नुकताच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला, यावेळी असंख्य संख्येने पालक व विद्यार्थी उपस्थित होते. उपस्थितांच्या चेहऱ्यांवर वेगळाच उत्साह पहावयास मिळाला. यात जेईई अॅडव्हान्स २०२१ , किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना (केव्हीपीवाय), एमएचटी- सीईटी आणि दहावी बोर्डाचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना टिप-टॉप प्लाझा, ठाणे, मुंबई येथे झालेल्या सोहळ्यात बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.

एलन करिअर इन्स्टिट्यूटचे संचालक गोविंद माहेश्वरी, राजेश माहेश्वरी, नवीन माहेश्वरी, बृजेश माहेश्वरी. अमन माहेश्वरी आणि अमित मोहन अग्रवाल (केंद्र प्रमुख) आणि वल्सराज नायर (अॅडमिन हेड) देखील उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भजनाने झाली. यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम व पारितोषिक वितरण झाले. कार्यक्रमादरम्यान, गोविंद माहेश्वरी यांनी काही मधुर भजने गायली ज्यामुळे सर्व उपस्थित आनंदी झाले. यावेळी बृजेश माहेश्वरी म्हणाले, दरवर्षी एलन सर्वोत्तम परिणाम देत आहे. एवढेच नाही तर परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून विद्यार्थी नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहेत. दरवर्षी नवीन उंची गाठण्याचे आमचे ध्येय आहे.

राजेश माहेश्वरी म्हणाले की, एलन विविध क्षेत्रात विस्तारत आहे. २०२८ मध्ये २.५ कोटी विद्यार्थ्यांचे आमचे लक्ष्य आहे आणि ते साध्य करण्यासाठी टीम समर्पितपणे काम करत आहे. एकत्र कुटुंब म्हणून, एलन नवीन उंची गाठत आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा, असे गोविंद माहेश्वरी म्हणाले. नवीन माहेश्वरी पुढे म्हणाले की, एलन विद्यार्थ्यांना प्रत्येक सुविधा देण्यासाठी कटिबद्ध आहे.

एलनचे संचालक ब्रिजेश माहेश्वरी म्हणाले की, एलन महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गरज पूर्ण करत आहे. मुंबईसोबतच नांदेड, पुणे आणि नागपूर येथेही क्लासरूम कोचिंग दिले जात आहे. एलन येथे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे इंजिनीअर आणि डॉक्टरचे करिअरचे स्वप्न पूर्ण झाले आहे. साधनांच्या अभावी कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, हा आमचा उद्देश आहे. सोहळ्यात सत्कार करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये, जेईई अॅडव्हान्स एआयआर-१४ अमेय प्रशांत देशमुख, एआयआर -२३ गोविंद कुमार, एआयआर ७० हर्ष हिमांशू वोरा, एआयआर ७९ आर्यन शर्मा, एआयआर ८२ ध्रुव अहलावत , जेईई-मेन महाराष्ट्र टॉपर अमेय प्रशांत देशमुख यांचा समावेश होता.  अमित मोहन अग्रवाल यांनी केंद्राच्या कामगिरीबद्दल माहिती देऊन आभार मानले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading