पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी महापालिका करत आहे -अविनाश बागवे

पुणे : नियमबाह्य पद्धतीने सत्यम संस्थेला महापालिकेलेने टेंडर दिले गेले आहे.या संस्थेने खोटी शासकीय कागदपत्रे तयार करून प्रशासनाची दिशाभूल करून महापालिकेचे टेंडर मिळविले आहे.मुळात सदर कंपनी ही नियमबाह्य असल्याने प्रशासन परवानगी देत नसतांना  सत्ताधारी भाजपाच्या दबावाखाली या संस्थेला टेंडर दिले आहे. अशा बोगस कारभारामुळे पुणेकरांच्या पैशांची उधळपट्टी महापालिका करत आहे. त्यामुळे यामधील सर्व दोषींवर त्वरित कारवाई करण्यात यावी. अशी मागणी पत्रकार परिषदेत काँग्रेस पक्षाचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी केली.

यावेळी अविनाश बागवे म्हणाले,त्यांनी ‘सत्यम’ या संस्थेच्या भ्रष्टकारभाराची सर्व कागदोपत्री पुराव्यानिशी पोलखोल केली.’
अविनाश बागवे म्हणाले.,सत्यम’ संस्था हे फक्त ट्रेलर आहे.अशा अनेक बोगस संस्था जनतेच्या पैशांवर महापालिकेने पोसल्या आहेत.त्या सर्वांचा कारभार  जनतेसमोर येईल.असे अविनाश बागवे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: