एसटी कर्मचारी संपाला जनशक्तीचा जाहीर पाठिंबा

औरंगाबाद: एसटी कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाला जाहीर पाठिंबा देण्याचे कारण त्यांनी शासनाकडे केलेल्या मागण्या आपल्या न्याय हक्कासाठी खूप गरजेचे आहे एसटीचे शासनामध्ये विलीनीकरण करणे महागाई भत्ता लागू करणे आणि आज पर्यंत एसटी कामगार व कर्मचारी सोसलेला अन्याय अत्याचार या महाराष्ट्रातील सर्वाच जनतेनी लोकप्रतिनिधीने तमाम मंत्र्यांनी व विविध पक्षांनी उघड्या डोळ्यांनी बघितला पण आज देव दुता सारखा असणारा एसटी कामगार व कर्मचारी यांना त्यांच्या पाठीशी उभा राहण्याची व त्यांना सहारा देण्याची खरी गरज आहे त्या अनुषंगाने जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय अतुल भाऊ खूपसे यांच्या आदेशाने औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष प्रभाकर भुसारे बापू महानगर प्रमुख कल्याण शिंदे सर जिल्हा सचिव संतोष जी घाडगे व समस्त जिल्ह्यातील जनशक्ती संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते व सहकारी या सर्वांच्या वतीने या पुकारलेल्या संपास आमचा सर्वांचा जाहीर पाठिंबा आहे. 

एसटी कर्मचारी व कामगारांच्या न्याय हक्कासाठी वेळप्रसंगी जनशक्ती संघटनेला या वेळप्रसंगी लढा तीव्र करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये उभ्या महाराष्ट्रामध्ये हा लढा तीव्र करण्यासाठी जनशक्ती संघटना मोलाची भूमिका बजावेल शेवटच्या श्वासापर्यंत कामगार कर्मचारी यांच्या न्याय हक्कासाठी सदैव त्यांच्या पाठीशी राहील असे आश्वासन आदरणीय प्रदेशाध्यक्ष अतुल भाऊ खूपसे पाटील जनशक्ती संघटना महाराष्ट्र राज्य यांनी दिले आहे पाठिंब्याचे पत्र दिल्यानंतर समस्त कर्मचारी कामगारांमध्ये आनंदाची लहर दिसून आली व त्यांच्या चेहऱ्यावर ती आनंद उत्सव दिसत होता. 

Leave a Reply

%d bloggers like this: