Pune – सहा महिन्यात ३७ लाख ९० हजार २७ कोरोना लस डोस देण्यात आले

पुणे: पुण्यात १ मेपासून अठरा वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. त्या अंतर्गत शासकीय रुग्णालयांमधील लसीकरण केंद्रांमध्ये कोविशील्डचे १८ लाख ३५ हजार ९३५ डोस देण्यात आले. तर, कोवॅक्सीनचे एक लाख ८६ हजार ३९७ डोस लाभार्थ्यांना मिळाले. खासगी रुग्णालयांमधील लसीकरण केंद्रांमधून लस घेण्यासाठी नागरिकांनी रांगा लावल्या होत्या. त्यातून कोविशील्डचे १६ लाख ५६ हजार ८१७ आणि कोवॅक्सीनचे ७० हजार ४१ डोस देण्यात आले.

जूनमध्ये रशियात उत्पादित झालेल्या स्पुटनिक लशीचेही वितरण सुरू झाले. हे वितरण खासगी रुग्णालयांमधील केंद्रातून होत होते. या लशीचेही दोन डोस आहेत. पहिला डोस झाल्यानंतर पुढील २८ दिवसांनी लशीचा दुसरा डोस घेता येतो. पुण्यातील ४० हजार ८३७ जणांनी या लसीचे डोस घेतले आहेत. त्यामुळे खासगी आणि सरकारी रुग्णालयात कोविशील्ड, कोवॅक्सीन आणि स्फुटनिक लसींचे मिळून ३७ लाख ९० हजार २७ डोस देण्यात आल्याची माहिती महापालिकेतर्फे दिली.
अद्यापही सव्वालाख लोकांचा पहिला डोस राहिला आहे. लसीकरणाच्या नियोजनात लसींच्या कोट्यातील १० टक्के लस ही पहिला डोस घेणाऱ्यांसाठी राखीव आहे.

दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या अद्याप कमी असून, त्यांचे लसीकरण वेगाने करण्याचा प्रयत्न महापालिका करत आहे. त्यासाठी रोजच्या नियोजनात ९० टक्के कोटा ठेवण्यात आला आहे.

  • डॉ. सूर्यकांत देवकर, महापालिका लसीकरण विभाग प्रमुख

Leave a Reply

%d bloggers like this: