‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धा : पृथ्वीराज मोहोळ, हर्षद कोकाटे करणार पुणे शहराचे नेतृत्व

पुणे :६४व्या माती व गादी राज्य अजिंक्य स्पर्धा व मानाच्या ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेत सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने पुणे शहराच्या निवड चाचणीचे आयोजन करण्यात आले होते. माती विभागातून खालकर तालीमचा पृथ्वीराज मोहोळ तर गादी विभागातून हनुमान आखाड्याचा हर्षद कोकाटे पुणे शहर संघाचे नेतृत्व करणार आहेत.
मंगळवार पेठ येथील छत्रपती स्टेडियम येथे राष्ट्रीय तालीम संघाच्या वतीने चाचणी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रीय तालीम संघाचे अध्यक्ष दामोदर टकले, ऑलिम्पिकवीर मारुती आडकर, कार्याध्यक्ष हिंदकेसरी योगेश दोडके, सचिव शिवाजीराव बुचडे, अर्जुनवीर काकासाहेब पवार, उपमहारष्ट्र केसरी संतोष गरुड, विश्वस्त तात्यासाहेब भिंताडे, खजिनदार मधुकर फडतरे, नगरसेवक गणेश ढोरे, माजी नगरसेवक तानाजी निम्हण, जयसिंगआण्णा पवार, योगेश पवार, अविनाश टकले, गणेश दांगट आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
राष्ट्रीय तालीम संघाचे सचिव शिवाजीराव बुचडे यांनी जाहीर केलेला पुणे शहर संघ पुढील प्रमाणे :
माती विभाग:
५७ किलो: अमोल वालगुडे (प्रथम, हनुमान आखाडा), विजय मोझर (द्वितीय, जायनाथ तालीम)
६१किलो: सचिन दाताळ (प्रथम, मा.मोहोळ संकुल), प्रवीण हरणावळ (द्वितीय, मा.मोहोळ संकुल)
६५ किलो: प्रीतम घोरपडे (प्रथम, सिंहगड कुस्ती संकुल), प्रितेश वाघमारे (द्वितीय, हनुमान आखाडा)
७० किलो: निखिल कदम (प्रथम, शिवरामदादा तालीम), निखिल पोकळे (द्वितीय, दत्तनगर तालीम)
७४ किलो: आकाश डुबे (प्रथम, गोकुळ वस्ताद तालीम), निखिल गायकवाड (द्वितीय, हनुमान आखाडा)
७९ किलो: व्यंकटेश बनकर (प्रथम, मुकुंद व्यायामशाळा), अतुल पानसरे (द्वितीय, हनुमान आखाडा)
८६ किलो: अमित गायकवाड (प्रथम, गोकुळ वस्ताद तालीम), आकाश दिवे (द्वितीय, शिवरामदादा तालीम)
९२ किलो: दत्तात्रय चव्हाण (प्रथम, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल), अंबर सातव (द्वितीय, मा.मोहोळ संकुल)
९७ किलो: मनीष रायते (प्रथम, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल), तन्मय रेणुसे (द्वितीय, निंबाळकर तालीम)
महाराष्ट्र केसरी गट: पृथ्वीराज मोहोळ (प्रथम, खालकर तालीम), तानाजी झुंजूरके (द्वितीय, चिंचेची तालीम)
गादी विभाग :
५७ किलो: दीपक पवार (प्रथम, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल), निलेश सणस (द्वितीय, चिंचेची तालीम)
६१ किलो: सौरभ शिंदे (प्रथम, खालकर तालीम), साहिल खरात (द्वितीय, नवी खडकी)
६५ किलो: रावसाहेब घोरपडे (प्रथम, सह्याद्री संकुल), रोहित लोंढे (द्वितीय, नगरकर तालीम )
७० किलो: स्वप्नील शिंदे (प्रथम, सुभेदार तालीम), जय शिरस (द्वितीय, सह्याद्री संकुल)
७४ किलो : शुभम थोरात (प्रथम, शिवरामदादा तालीम), गणेश रसाळ (द्वितीय, हनुमान आखाडा)
७९ किलो : अक्षय चोरघे (प्रथम, मा. मोहोळ संकुल), वैभव तांगडे (द्वितीय, हनुमान आखाडा)
८६ किलो : अभिजित भोईर (प्रथम, मा. मोहोळ संकुल), लौकिक सुर्वे (द्वितीय, हनुमान आखाडा)
९२ किलो : आनंद मोहोळ (प्रथम, सह्याद्री संकुल)
९७ किलो : अक्षय भोसले (प्रथम, शिवरामदादा तालीम), निलेश केदारी (द्वितीय, हनुमान आखाडा)
महाराष्ट्र केसरी गट : हर्षद कोकाटे (प्रथम, हनुमान आखाडा), अनिकेत तांगडे (द्वितीय, आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल)

Leave a Reply

%d bloggers like this: