आज दिवसभरात पुणे शहरात कोरोनाच्या 82 रुग्णांना डिस्चार्ज

पुणे: शहरामध्ये कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत मागील काही दिवसांपासून नवीन रुग्णांच्या तुलने बरे होण्याऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त होते. परंतु आज रुग्णांची कमी  असून  शंभर च्या खाली आज  रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरामध्ये  गेल्या 24 तासात 69नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तर 82रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पुणे शहरात आजपर्यंत 5लाख 04हजार  759इतके कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहे. त्यापैकी 4लाख 95हजार 025इतके रुग्ण बरे झाले आहेत. पुण्यात गेल्या 24 तासात 2रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरातील 0तर पुणेमहापालिका हद्दीबाहेरील 2रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत पुणे शहरात 9077जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.शहरामध्ये सध्या 657रुग्ण अ‍ॅक्टिव्ह  आहेत. त्यापैकी 103रुग्ण गंभीर आहेत, आज दिवसभरात शहरातील विविध केंद्रांवर 5667 स्वॅब तपासण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: