वंचितांच्या दिवाळीला माणुसकीचा आधार

पुणे : सर्वत्र दिवाळी साजरी होत असताना समाजातील निराधार, गरीब कुटुंब मात्र या आनंदापासून दूर असतात. या वंचित घटकांतील व्यक्तींनाही दिवाळीचा आनंद घेता यावा, त्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्ट चे कार्याध्यक्ष दिपक निकम यांनी पुढाकार घेतला. शहरात ठिकठिकाणी गरजू कुटुंबांना दिवाळी फराळ वाटप करण्यात आले. त्यामुळे अनेकांची दिवाळी आनंदमय बनली आहे.

शहरातील वारजे, कर्वेनगर, कोथरूड, कर्वे रोड, पौड, लॉ कॉलेज, पौड फाटा, डेक्कन, शनिवार वाडा, मनपा, सिंहगड रोड, शिवाजी नगर परिसरा जाऊन ५०० पॅकेट फराळ वितरण केले. त्यात लाडू, करंजी, शंकरपाळी, चिवडा, चखली इ. चा सामावेश होता.

रस्त्याच्या कडेला घर करून राहणाऱ्यांच्या घरात दिवाळीचा सण साजरा होत नाही. त्यांच्या घरातही दिवाळी साजरी झाली पाहिजे, त्यांच्या चेहऱ्यावर देखील आनंद दिसला पाहिजे. या हेतूने दिवाळी फराळ वाटपाचा उपक्रम राबवला असल्याचे दिपक निकम यांनी सांगितले.

या उपक्रमासाठी श्री शनि मारुती बाल गणेश मंडळ ट्रस्ट संस्थापक अध्यक्ष दीपक निकम गणेश मंडळ अध्यक्ष सचिन पवार तर सदस्य केतन गायकवाड, सूरज जाधव, गणेश शेलार, मंगेश सुपेकर, सुनील तेलंग, आकाश पाडेकर, रोहित घाणेकर, राज पेंढारे, तुषार ठोकळे, साहिल सुपेकर, गणेश मोरे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

%d bloggers like this: