fbpx

Pune – सुवर्णालंकारांनी सजल्या तुळशीबागेतील श्रीराम-लक्ष्मण-सीता मूर्ती


श्रीरामजी संस्थान तुळशीबाग ; दिपावलीनिमित्त मंदिरात विद्युतरोषणाई, दीपोत्सव, रंगावली

पुणे :तुळशीबागेमध्ये आहे, बरवी मूर्ती रामाची…नयनी नित्य पाहता, हरतील पापे अनंत जन्माची या उक्ती नुसार श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्याकरीता दीपावलीच्या निमित्ताने पुणेकरांनी सकाळपासून राममंदिरात गर्दी केली. श्रीराम, लक्ष्मण आणि सीतेच्या मूर्तीला नव्या सुवर्णालंकारांनी सजविण्यात आले. रेशमी वस्त्र आणि नवे सोन्याचे दागिने यामुळे या तिन्ही मूर्तींचे रुप अधिकच खुलून दिसत होते.

श्रीरामजी संस्थान तुळशीबाग च्यावतीने नव्याने साकारण्यात आलेले सुवर्णालंकार दिपावलीच्या निमित्ताने श्रीराम-लक्ष्मण-सीतेच्या मूर्तीला घालण्यात आले. तसेच मंदिरात विद्युतरोषणाई, दीपोत्सव, रंगावली व विधीवत पूजन पारंपरिक पद्धतीने करण्यात आले. यावेळी संस्थानचे कार्यकारी विश्वस्त रामदास तुळशीबागवाले, भरत तुळशीबागवाले, राघवेंद्र तुळशीबागवाले, श्रीपाद तुळशीबागवाले, शिशिर तुळशीबागवाले, कोटेश्वर तुळशीबागवाले यांसह तुळशीबागवाले परिवार उपस्थित होता.

रामदास तुळशीबागवाले म्हणाले, नव्याने साकारण्यात आलेले सोन्याचे दागिने दिपावलीच्या निमित्ताने श्रीरामचंद्र, लक्ष्मण व सितामाईंच्या मूर्तीला घालण्यात आले आहेत. यामध्ये श्रीराम व लक्ष्मणाच्या मूर्तीला हत्तीचे पेंडंट असलेले हार, नवरत्न कंठी, तोडे, पैंजण आणि सितामाईच्या मूर्तीला वज्रटिक, मंगळसूत्र, दशावतार साज, तोडे, पैंजण, कंबरपट्टा आदी दागिन्यांचा समावेश आहे. मंदिरात रामनवमी सह विविध उत्सव गेली २५९ हून अधिक वर्षे सुरु आहेत. दीपावलीनिमित्त मंदिराला आकर्षक सजावट देखील करण्यात आली आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: