Saturday, May 2, 2026
Latest NewsPUNE

शिवछत्रपतींच्या पुतळ्यासमोर दिवाळी पाडवासंध्येला होणार ८ हजार पणत्यांचा लखलखाट

पुणे : शिवजयंती महोत्सव समितीतर्फे शिवशके ३४८, दिवाळी पाडवा शुक्रवार, दि. ५ नोव्हेंबर २०२१ रोजी संध्याकाळी ६ वाजता छत्रपती शिवाजी महाराज दिपोत्सव २०२१ पर्व १० वे चे आयोजन श्री शिवछत्रपती पुतळा, एसएसपीएमएस शाळा, शिवाजी महाराज चौक, शिवाजीनगर येथे करण्यात आले आहे. दिपोत्सवाचे उद्घाटन शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळा २०२० मध्ये सहभागी झालेल्या स्वराज्य घराण्यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती समितीचे आद्य प्रवर्तक संस्थापक अध्यक्ष अमित गायकवाड यांनी दिली.

शिवछत्रपतींचा हा जगातील पहिला भव्य अश्वारुढ पुतळा तसेच एकसंघ ओतीव काम केलेला एकमेव पुतळा आहे. राजर्षि शाहुछत्रपती पुत्र श्रीमंत राजाराम छत्रपती यांच्या अध्यक्षतेखाली १६ जून १९२८ साली या पुतळ्याचे अनावरण झाले होते. पुतळ्याचे यंदा ९३ व्या वर्षात पदार्पण झाले आहे. पुतळयाचे वजन तब्बल ८००० किलो आहे. त्यामुळे किलोमागे एक पणती अशा ८ हजार पारंपरिक पणत्यांची मानवंदना देण्यात येणार आहे.

सरनौबत नागोजीराव कोकाटे, श्रीमंत माने सरकार घराणे, सरदार हिरोजी इंदलकर, श्रीमंत सरदार राऊतराव ढमाले, श्रीमंत सरदार दयाजीराव मारणे गंभीरराव, सप्तसहस्त्री सरदार नावजी बलकवडे, वीर माता धाराऊ गाडे, समुद्रस्वामी दयार्सारंग सरखेल कान्होजी आंग्रे, सरदार शिवाजी इंगळे, सरदार हिमंतबहाद्दर विठोजी चव्हाण, भोई स्वराज्यबांधव, राजे लखोजीराव जाधवराव या स्वराज्यघराण्यांनी शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभाग घेऊन यशस्वी ५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल श्री शिवछत्रपतींचा जिरेटोप देऊन विशेष गौरव करण्यात येणार आहे.

तसेच यंदा शिवजन्मोत्सव स्वराज्यरथ सोहळ्यात सहभागी झालेल्या स्वराज्यनिष्ठ येसाजी कामठे, श्रीमंत हरजीराजे बर्गे, शिवरायांचे शिलेदार डिंबळे, श्रीमंत तापकीर सरदार, वीर सरदार मालोजी भिलारे, पानीपत वीर महादजी माळवदकर, पानीपत वीर महादजी व दादजी हरपळे, प्रतापगड युध्दवीर सहस्त्री सरदार कोडांजी वरखडे, दक्षिण दिग्वीजय वीर मानाजी मोरे या स्वराज्यघराण्यांचा सन्मान करण्यात येईल. तरी पुणेकरांनी मोठया संख्येने या अनोख्या नेत्रदिपक दिपोत्सव मानवंदनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading